ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

महापुरुषांचे विचार जतन करावे. – प्राचार्य विकी घायतडक

महापुरुषांचे विचार जतन करावे. – प्राचार्य विकी घायतडक

भारत काॅम्प्यूटर इन्स्टिट्यूट टायपिंग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

जामखेड प्रतिनिधी;-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा अशी तीन मुल्ये आपणाला दिली आहेत. परंतु आज पाहिले तर पहिले संघर्ष करावा लागतो संघर्षानंतर संघटन करावे लागते विचार नसल्यामुळे शिक्षण ही घेत आहेत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे १८ तास अभ्यास करायचे . परंतु आजच्या लोकांना लेक्चर ऐकायचे असेल तर कंटाळवाणा येतो ,अशा पद्धतीची मानसिकता झाली आहे. प्राचार्य गायकवाड सर हे इन्स्टिट्यूट मार्फत महापुरुषांच्या जयंती साजरी करतात,कारण महापुरुषांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत जावे. या जयंतीनिमित्त मी एवढेच आवाहन करेल की ,विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यास चांगल्या पद्धतीने करून महापुरुषांचे विचार जतन करावे.

असे यावेळी प्राचार्य विकी घायतडक यांनी आपले मत व्यक्त केले.

जामखेड शहरातील भारत कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट टायपिंग येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डिप्लोमा कॉलेज चे प्राचार्य विकी घायतडक यांच्या हस्ते व बौध्दाचार्य अशोक आव्हाड यांच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्ध वंदना तसेच अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य निलेश गायकवाड, नासीर सय्यद, धनराज पवार ,राजेंद्र कापसे,सिमा सानप,राधा चौरे, सुमती विश्वास आदी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट टायपिंग चे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

error: Content is protected !!