ब्रेकिंग न्युज
घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनआरटीईचा घोळ संपला, उद्यापासून भरता येणार ऑनलाइन अर्ज, हा केला महत्वाचा बदलमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी 

*अपकी माँगे पुरी करुंगा और मरते दम तक आपका साथ निभाऊंगा* *बजरंग सोनवणेंची ईद ए मिलाप कार्यक्रमात मुस्लिम समाजबांधवांना ग्वाही*

 

 

बीड !प्रतिनिधी

 

लोकसभा चूनाव में चूनके आने के बाद इस जिले का सांसद बनुंगा. तब मै अपकी जो माँगे है, वो पुरी कर दूंगा. और मैं मरते दम तक आपके साथ रहुंगा. अशी ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी बीड येथे माजी आमदार सय्यद सलिम यांनी आयोजित केलेल्या ईद ए मिलाप कार्यक्रमात मुस्लिम समाजबांधवांना दिली.

 

बीड शहरातील गॅलेक्सी फंक्शन हॉल येथे सोमवारी माजी आमदार सय्यद सलीम यांनी आयोजित केलेल्या ईद ए मिलाप निमित्त कार्यक्रमात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे बोलत होते. कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार संदीप क्षिरसागर, माजी आमदार सिराज देशमुख, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश वरेकर, परमेश्वर सातपुते, शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

पुढे बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की, मुस्लिम बांधवांसाठी शिक्षण व आरोग्य व्यवस्थेसाठी काम करणार आहे. हे काम करण्यासाठी भाजप खासदार अपयशी ठरल्या आहेत. असा आरोप ही त्यांनी केला. या कार्यक्रमाला मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

 

————–

 

*चौकट* :-

 

कोचिंग क्लासेस चालकांची घेतली बैठक.

 

————–

 

इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी सोमवारी रात्री बीड शहरातील सर्व कोचिंग क्लासचे संचालकांची भेट घेऊन बैठक घेतली. सरकारने क्लासेस चालकांना घालून दिलेल्या १६ वर्षाच्या आतील विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये प्रवेशास बंदी, विद्यार्थ्यांना फिसची पावती देणे बंधनकारक, सकाळी ६ वाजेपुर्वी व रात्री ७ वाजेनंतर कोचिंग क्लासेसचे वर्ग घेण्यास मनाई अशा अटी व नियम रद्द करण्यात यावेत अशी मागणी क्लासेस संचालकांची यावेळी केली त्यांच्या एकूणच अडचणींबाबत सोनवणे यांनी चर्चा केली व याप्रश्नी निवडून आल्यानंतर सर्वच स्तरावर प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

error: Content is protected !!