ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

बीड मतदारसंघामध्ये अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान; तत्काळ पंचनामे करावेत

बीड मतदारसंघामध्ये अवकाळी पावसामुळे
अतोनात नुकसान; तत्काळ पंचनामे करावेत
रा.काँ.चे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांची पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी
बीड प्रतिनिधी;-दि.१८ : बीड व शिरूर कासार तालुक्यात बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक गावांमध्ये पिकांसह अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.
बीड जिल्ह्याला बुधवारी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. बीड शहरासह अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर अनेक ठिकाणी वादळी वारे वाहत होते. मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह शहरात तब्बल २ तास पाऊस झाला. यामुळे ठिकठिकाणी पाणीच पाणी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या पावसामुळे बीड व शिरूर कासार तालुक्यात काही गावात गोठे, घरांची पडझड झाली आहे. झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच, पिके, फळबागांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा विस्कळीत झाल आहे. या सर्व परिस्थितीचा पंचनामा करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करावी, अशी मागणी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.
चौकट
मागणीची पालकमंत्र्यांकडून दखल
डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या मागणीची दखल घेऊन ना.धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याची निर्देश दिले आहेत. त्यानुसार तहसील प्रशासन कामाला लागले आहे.
error: Content is protected !!