ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

भाजपा कामगार मोर्चाचा गाव तिथे कामगार मित्र संकल्पना राज्यात अव्वल- खा.प्रितम मुंडे

भाजपा कामगार मोर्चाचा गाव तिथे कामगार मित्र संकल्पना राज्यात अव्वल- खा.प्रितम मुंडे
बीड प्रतिनिधी- भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेली गाव तिथे कामगार मित्र ही संकल्पना राज्यात अव्वल असल्याचे प्रतिपादन बीड जिल्ह्याच्या खा.प्रितम मुंडे यांनी भाजपा प्रचार कार्यालयाच्या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये म्हणाल्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्यात गौरवास्पद गाव तिथे कामगार मित्र ही संकल्पना म्हणजे बीड जिल्हा कामगार मोर्चाचा ’कणा’आहे.
येत्या कामगार दिनी भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश गिरी यांच्या संघटन कौशल्यातून बीड शहरात घरेलु कामगार महिला भगिनींचा  मेळावा घेऊन विजयाची गुढी उभारणार असे यावेळी दादासाहेब नन्नवरे
प्रदेश सचिव तथा मराठवाडा विभाग अध्यक्ष यांनी म्हटले आहे तर भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश गिरी यावेळी म्हणाले की, गाव पातळीवरील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना पोहोचविण्यासाठी कामगार मित्रांना विशेष प्रशिक्षण देवून जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
भाजपा जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनखाली  जिल्हा कामगार मोर्चा लोकसभेच्या प्रचाराला लागलेला आहे, त्यानुषंगाने आज बीड शहरात जिल्हा भरातील अकरा तालुका अध्यक्ष तथा त्यांच्या कार्यकारिणी सह सर्व जिल्हा,विभागीय पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.
यामध्ये भाजपाचे चंद्रकांत फड, बालाजी पवार, संध्या राजपुत, लालासाहेब पन्हाळे, दिलीप बडे, प्रित कुकडेजा, राजेश पवार,रामेश्वर टिपरे,संतोष जाधव, ऋषिकेश स्वामी, शंकर झाडे, कृष्णा राठोड, मोहन राऊत, विलास जाधव, नेहा माळी सह जिल्हाभरातील पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत कोणत्याही प्रकारचे जातीपातीचे राजकारण न करता ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर होत आहे, यात कामगार मोर्चा हा आघाडी वर आहे. केंद्र तथा महाराष्ट्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी संपुर्ण राज्यातुन सर्व प्रथम बीड जिल्ह्यातुन गाव तेथे कामगार मित्र ही योजना श्री.विजय हरगुडे यांच्या सुचनेनुसार सुरु केली आहे.
यावेळी खा.प्रितम मुंडे यांनी मार्गदर्शन करतांना आपण विकास कामावर निवडणूक लढवत आहोत आणि आपले झालेले कामं मतदारांपर्यंत पोहचवा आणि पंकजा मुंडे यांना मतदान करून मोदीजींचे हात बळकट करा असे आवाहन केले.
तसे कामगार दिनी होणारी घरेलु कामगार महिलांची सभा ही कामगार मोर्चा ची ऐतिहासिक सभा असेल असे गौरवोद्गार खा.प्रितम मुंडे यांनी काढले सदरील बैठकीचे आभार संध्या राजपूत यांनी केले.
error: Content is protected !!