ब्रेकिंग न्युज
निघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताहपारगाव सिरस येथे बैलगाडी शर्यतीमध्ये आली रंगत ..!वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊतवाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळे

निंभोरा बु. येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेत भ्रष्टाचार विरोधीपक्षनेता फडणवीस साहेबांना दिले निवेदन.

निंभोरा बु. येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेत भ्रष्टाचार विरोधीपक्षनेता फडणवीस साहेबांना दिले निवेदन.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️राजेंद्र महाले | रावेर.
तालुक्यातील निंभोरा बु येथे मुख्यमंत्री पेयजल योजना २०१८ /२०१९ काम अपुर्ण झाले असुन भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप भाजपा शक्ती केंद्र प्रमुख श्री रवीभाऊ महाले यांनी केला असुन त्यांनी राज्याचे विरोधीपक्ष नेते फडणवीस साहेब यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे.
त्यानी निवेदनात असे म्हटले आहे की जळगांव जिल्हातील निंभोरा बु तालुका रावेर येथे २०१८ /२०१९ मधील मुख्यमंत्री पेयजल योजना अंतर्गत ६२ लाख रू मंजूर झाले होते परंतू फक्त ४२लाख रूपयाचे काम करण्यात येऊन बिले काढून काम अपुर्ण ठेवण्यात आले आहे.
या योजने अंतर्गत निंभोरा गावात संपुर्ण ६ इंची पाईप लाईन तसेच व्हाल व कंपाऊंड आणि पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी साहित्य मंजुर झाले असतांना मात्र ठेकेदार व अधिकारी तसेच एक अप्रत्यक्ष ठेकेदार यांनी संगममत करून गावात पाणीपुरवठा पाईप लाईन कुठे टाकली तर कुठे टाकली नाही,आणि बलवाडी ते निंभोरा पर्यत जीर्ण झालेली पाईप लाईन टाकलेली नाही .
या ठिकाणी ६ ईची पाईप लाईन तसेच व्हाल कंपाऊंड मंजूर असतांना कामाची पुर्तता न करता मात्र ४२ लाखाचे बिल काढण्यात आले आहे. आजही काही वार्डात पाईप लाईन टाकण्यात आलेली नाही, तरी गावातील मुख्यमंत्री पेयजल योजनेची चौकशी होऊन काम पुर्ण व्हावे तसेच या अपुर्ण झालेल्या कामात भ्रष्टाचार करणारे अधिकारी, ठेकेदारव सबंधित यांच्यावर कारवाई यावी,त्यांची तात्काळ चौकशी होऊन गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी भाजपा शक्ती केंद्र प्रमुख श्री रविभाऊ महाले यांनी निवेदनाद्वारे राज्याचे विरोधीपक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस याच्याकडे केली आहे.

error: Content is protected !!