ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

आय पी एस विरेश प्रभू यांचे 45व्या वाढदिवसा निम्मित्त सोलापूरात अभिनव उपक्रम-

सोलापूर संपादक महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभूते

सोलापूर चे माजी पोलिस आधिक्षक श्री.एस. विरेश प्रभू आय पी एस यांच्या वाढदिवसा निम्मित्त “आस्था रोटी बँक.सोलापूर” आणि “श्री. मश्रृम गणपती भक्त मंडळ. सोलापूर” तसेच “शहिद अशोक कामटे विचारमंच. सोलापूर” यांचे वतिने गोरगरिब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा उपक्रम किरिटेश्वर मठ.कुंभार वेस. सोलापूर या ठिकाणी करण्यात आला.
याप्रसंगी पूज्य.श्री.म.नि.प्र. स्वामीनाथ महास्वामीजी. किरिटेश्वर संस्थान मठ. सोलापूर , धनंजय पतंगे(पुजारि), राजू हौशेट्टी- (अध्यक्ष.मश्रृम गणपती भक्त मंडळ), विजय छंचुरे (आस्था रोटी बँक) ,पोलिस अधिकारी हाजी रसुल तांबोळी, गौतम कसबे(DK ग्रुप. सोलापूर) , श्री.योगेश कुंदूर(शहिद अशोक कामटे विचारमंच),
कांचन हिरेमठ, प्रकाश कलकोटे(उद्योजक), शिवा ढोकळे,किरण हिरेमठ, विकास कुंदूर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत हा आय पी एस विरेश प्रभू यांचा 45 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.
त्या प्रसंगी शहरातील 80गोरगरिब विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वही,कंपास,पाटी, पेंन्सिल इतर साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी राजू हौशेट्टी यांनी सांगितले की ” आय पी एस विरेश प्रभू यांनी वाढदिनी सत्कार प्रसंगी हारपुष्पगुच्छचा स्विकार न करता तो खर्च गरजू विध्यार्थीना शालेय साहित्य वाटप करुन माझा वाढदिवस साजरा केला तर ते मला आवडेल असे सुचना आय पी एस विरेश प्रभूनीं केल्यामुळे सदरचा उपक्रम राबविण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश कुंदुर यांनी केले तर आभार विजय छचुरे यांनी मानले

error: Content is protected !!