ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

’56 वर्षात जे घडलं नाही असा धक्का शिवसेनेला बसणार’

 

आज सकाळपासून विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात उतरल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सध्या मतांचं एकंदर गणित बघता शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी होऊ शकतात. मात्र, आमदार रवी राणा यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

शिवसेना एक उमेदवार 100 टक्के पराभूत होणार, असा दावा रवी राणा यांनी केला आहे. त्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यसभेत संजय पवारांना जी मतं मिळाली ती एकनाथ शिंदेंच्या मेहनतीमुळे मिळाली असल्याचं रवी राणा म्हणाले. तर भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील असा विश्वास देखील रवी राणा यांनी व्यक्त केला आहे.

एकनाथ शिंदेंना बाजूला ठेवून शिवसेनेनं ज्या पद्धतीनं विधानपरिषद निवडणुकीची आखणी केली. ते पाहता शिवसेनेचा एक उमेदवार 100 टक्के पडणार आहे, असा खळबळजनक दावा रवी राणा यांनी केला आहे. गेल्या 56 वर्षात जे घडलं नाही असा धक्का शिवसेनेला विधानपरिषदेत बसणार आहे, असं वक्तव्य देखील रवी राणा यांनी केला आहे. दरम्यान, रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे आजच्या निवडणुकीचा काय निकाल लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

error: Content is protected !!