ब्रेकिंग न्युज
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !

उत्तर सोलापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रमाणपत्र (अफेडेव्हीट) देण्यास तात्काळ सुरू करण्यात यावे.

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभूते

उत्तर सोलापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रमाणपत्र (अफेडेव्हीट) देण्यास तात्काळ सुरू करण्यात यावे.अशी मागणी सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी, तसेच गुळवंची गावचे उपसरपंच सागर राठोड यांनी उत्तर सोलापूर तालुक्याचे नायब तहसीलदार विश्वजीत गुंड यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक प्रवेशासाठी शैक्षणिक प्रमाणपत्र (अफेडेव्हीट) आवश्यक आहे. परंतु उत्तर सोलापूर तालुक्यातील तहसील ऑफिसमधून मंडल अधिकाऱ्यांमार्फत दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रमाणपत्र देण्याचे बंद करण्यात आले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे तसेच पुढील प्रवेशाची अंतिम तारीख संपण्याच्या अगोदर सर्व कागदपत्रे शैक्षणिक प्रवेशासाठी जमा नाही केल्यास, विद्यार्थ्यांचे फारमोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. याची दखल घेऊन तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून, उत्तर सोलापूर तालुक्यातील तहसीलदार यांना सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी सागर राठोड यांनी निवेदनाद्वारे दहावी व बारावी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रमाणपत्र देण्यास मान्यता द्यावी अशी विनंती केली आहे.यावेळी बेलाटीचे उपसरपंच प्रभु राठोड, कुलदिपभोसले,बाळु पवार, विशाल भगत, महेश सपाटे, रामकृष्ण पारवे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!