ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

साबला येथे एन.एस.सी.योजनेतून सिंगल फेज डिपी चे भूमिपूजन संप्पन्न. I

साबला येथे एन.एस.सी.योजनेतून सिंगल फेज डिपीचे भूमिपूजन संपन्न.

केज!प्रतिनिधी!

आमदार नमिताताई मुंदडा यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या सिंगल फेज डिपी कटारे वस्ती व नाईकनवरे वस्तीवर घरगुती वापरासाठी एन . एस . सी . योजनेतून सिंगल फेज डिपीचे भूमिपूजन अक्षय मुंदडा यांच्या शुभहस्ते संपन्न झाले .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अक्षय मुंदडा तर प्रमुख पाहुणे म्हणून महादेव सुर्यवंशी – अध्यक्ष – व्यापारी संघ तालुका केज , शरद इंगळे – युवा नेते भाजपा , सुरेश नांदे – मुख्याध्यापक – वसुंधरा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा , केज . मुंडे साहेब – सहाय्यक अभियंता केज (ग्रामीण ), डिकले लाईनमन साहेब केज , वळसे साहेब केज ,
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि प्रस्ताविक आदर्श शिक्षक नरहरी शहाजी काकडे यांनी केले . प्रस्ताविक करत असताना स्व . डॉ . विमलताई मुंदडा यांनी साबला या छोट्याशा गावात केलेल्या विकास कामाचा आढावा गावातील नागरिकांच्या समोर मांडला स्व . विमलताई यांनी शाळेसाठी चार रूम बांधून दिल्या , दोन सभागृह बांधून दिले , गावात सिमेंट रस्ता दिला , बौध्दवस्ती मध्ये बौद्ध समाजासाठीही सभागृह बांधून दिले . शेतातील लाईटचे काम असेल , शासकीय दवाखाण्यातील काही काम असेल , तर ते काम आजही नंदकिशोर मुंदडा हे तातडीने करतात . तसेच कानडी माळी ते साबला व साबला ते तरनळी , साबला ते धर्माळा या रस्त्याचे मजबूती करन ही स्व . विमलताई मुंदडा यांच्याच कार्यकाळात झाले होते .
तसेच आणखी गावातील काही मागण्याचे निवेदनही मा . अक्षय मुंदडा यांना देण्यात आले . त्यामध्ये साबला ते उमरी व साबला ते कोल्हेवाडी तसेच गावातील वस्ती रस्ते दत्त वस्ती रस्ता , नाईकनवरे वस्ती रस्ता, बौध्द समाजासाठी स्मशानभूमी , नाईकनवरे यांच्यासाठीही स्मशानभूमीची मागणी करण्यात आली .
अक्षय मुंदडा यांनी अध्यक्षीय समारोप करत असताना त्यांनी त्यांच्या मनोगतातून साबला या गावातील जे काही विकासात्मक कामे राहिली असतील ती करण्याच काम मी येणाऱ्या कार्यकाळात करेल अस आश्वासन दिल . ज्या प्रमाणे स्व . विमलताई मुंदडा यांनी केज विधान सभा मतदार संघाचा विकास केला तशाच प्रकारचा विकास करण्याच काम आपल्या सर्वांच्या सहकार्यान येणाऱ्या कार्यकाळात केलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली .
तसेच या कामासाठी जागा उपलब्ध करून देणारे गणेश दशरथ कटारे यांचा सत्कार अक्षय मुंदडा यांच्या शुभहस्ते करण्यात आला .
तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अरुण राऊत , भैरवनाथ चाळक , अशोक नाईकनवरे, रामराजे शिंदे , अशोक काकडे , पोपट काकडे , रंगनाथ काकडे , मधुकर नाईकनवरे , उध्दव नाईकनवरे , सोपान नईकनवरे , लखन राऊत , दशरथ कटारे , लखन कटारे , इंटर नाईकनवरे , गणेश सरवदे , श्रीमंत नाईकनवरे , अनिल भोसले , दिलीप नाईकनवरे , प्रकाश नाईकनवरे इत्यादिंच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला . या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार लखन कटारे यांनी मानले .

error: Content is protected !!