ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

*पिंपळगाव येथील महालक्ष्मी महिला बचत गट व येडेश्वरी महिला बचत गटांकडून स्वच्छता मोहीम यशस्वी*

केज /प्रतिनिधी

केज तालुक्यातील पिंपळगाव येथील महालक्ष्मी महिला बचत गट व येडेश्वरी महिला बचत गटांकडून रोजगार हमी योजनेअंतर्गत स्वच्छता मोहीम सुरू केली असून गावातील वेगवेगळया ठिकाणी जाऊन गाव स्वच्छता करत असल्याचे पाहायला मिळाले .गावातील पिंपळगाव हायस्कुल पिंपळगाव येथील शाळेत जाऊन शाळेतील परिसरात आलेले गवत खुरपुन व काडी कचरा गोळा करून शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
महिला बचत गटामार्फत रोजगार हमी योजेतून विविध ठिकाणची स्वच्छता राबविण्यात येत आहे त्यामुळे गावातील परिसर , शाळेचा परिसर स्वच्छ दिसून येते आहे त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या स्वच्छता मोहिमेमध्ये महालक्ष्मी बचत गटाचे अध्यक्षा सीमा बाळासाहेब जाधव, व सचिव नीता प्रदीप जाधव तसेच येडेश्वरी महिला बचत गटाचे सचिव प्रियंका सुरेश गायकवाड तसेच महिला बचत गटातील दया संतोष जाधव,शारदा सूर्यभान गायकवाड, चंद्रकला विष्णू गायकवाड, शितल रामनाथ गायकवाड, सुषमा अनिल घोळवे, अनुसया नामदेव गायकवाड, संगीता विक्रम उगलमुगले ,फुलाबाई श्रीराम कदम, रजिया अब्बास शेख ,सुदामती आण्णा उगलमुगले ,तारामती वायबसे ,गौळण दादाराव वायबसे ,सुनीता बळीराम कराड ,तुळसाबई सुदाम घोळवे या महिलांनी शाळेचा परिसर स्वच्छ केला.

error: Content is protected !!