ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे घ्या आरोग्यदूत आ बच्चू (भाऊ) कडू

 

करमाळा (प्रतिनिधी )-
ज्यावेळेस एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज भासते त्यावेळेस रक्ताची किंमत कळते एका रक्ताच्या पिशवीमुळे एका रुग्णाचे प्राण वाचू शकतात एवढी ताकद रक्तदानात आहे. यामुळे सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे घेऊन राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी प्रयत्न करावेत. असे आव्हान माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांनी केले ते पुढे म्हणाले की,
हिंदूंच्या रक्तामुळे मुसलमानाचे प्राण वाचते मुसलमानाच्या रक्तामुळे एखाद्या मागासवर्गीयाचे प्राण वाचते दलिताच्या रक्तामुळे सुवर्ण समाजातील लोकांचे प्राण असते यातच खरी राष्ट्रीय एकात्मता आहे
आज करमाळा येथे स्वातंत्र्यसैनिक मनोहर पंत गणपत चिवटे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल संचलित श्वास फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केलेल्या श्री कमला भवानी ब्लड बँकेचे उद्घाटन आमदार बच्चू कडू व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीक सहाय्यक मंगेश चिवटे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी आमदार बच्चू कडू बोलत होते.
मान्यवरांचे स्वागत ब्लड बँकेचे संचालक जीवन सगरे दीपक रामलिंग पाटणे यांनी केले.
यावेळी पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आज करमाळ्यात मंगेश चुटे यांच्या पुढाकारातून सुरू झालेली ब्लड बँक करमाळा तालुक्यातील रुग्णांना जीवनदायी ठरणार आहे मात्र त्यासाठी रक्त संकलन होणे गरजेचे आहे. यासाठी विशेषतः तरुण पिढीने पुढाकार घेऊन वारंवार रक्तदान शिबिरे घ्यावीत.

यावेळी बोलताना स्वातंत्र्यसैनिक मनोहर पंत चिवटे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक महेश चिवटे म्हणाले, की लवकरात लवकर डायलिसिस सेंटर उभा करण्याचे आमचे स्वप्न असून जेणेकरून डायलिसिस साठी रुग्णांना बाहेर गावी जावे लागणार नाही.
रक्तदान शिबिरे आयोजित करणाऱ्या सामाजिक राजकीय संस्थांना त्यांच्या शिफारसीनुसार गरजू गरीब रुग्णांना मोफत रक्त देण्याची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले.
यावेळी व्यवस्थापक निलेश पाटील यांनी आभार मानले.

स्वातंत्र्य सैनिक मनोहरपंत चिवटे स्पेशल मधील श्री कमला भवानी ब्लड बँकेचे उद्घाटन करताना आमदार बच्चू कडू संचालक दीपक पाटणे व्यवस्थापक निलेश पाटील मुख्यमंत्री कार्यालयाचे कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे दिसत आहेत.

error: Content is protected !!