ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

पांचाळ यांना विश्वकर्मा सोशल वेलफेअर फाऊंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य “समाजभूषण पुरस्कार” प्रदान.

पांचाळ यांना विश्वकर्मा सोशल वेलफेअर फाऊंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य “समाजभूषण पुरस्कार” प्रदान.

🔸अशोक काळकुटे | संपादक

विद्यार्थी गुणगौरव आणि समाज भूषण सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह पुणे येथे आयोजित करण्यात आला कार्यक्रमांच्या सुरवातीला श्री प्रभू विश्वकर्मा च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

पुणे | प्रतिनिधी
विवेकानंद पांडुरंग सुतार विश्वस्त
प्रकाशजी दिघे विश्वस्त सचिव
दिलीपजी सुतार विश्वस्त अध्यक्ष
विश्वकर्मा सोशल वेलफेअर फाऊंडेशन पुणे यांच्यावतीने गेल्या ८ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व समाजास भुषणावह असलेल्या व्यक्तिमत्वांचा सन्मान करत असून समाजभूषण पुरस्कारासाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी लढा देणाऱ्या बीड येथील विश्वकल्याण महिला सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा किस्किंदाताई पांचाळ यांना “समाजभूषण पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले आहे.
दि.११ सप्टेंबर रविवार रोजी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर भवन पुणे या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरूवातीस श्री.प्रभु विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आ.उमाताई खापरे पिंपरी चिंचवड जिल्हा प्रथम महिला आमदार डाॅ.मुकुंद तापकीर अभ्यासन प्रमुख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या उपस्थितीत किस्किंदाताई पांचाळ यांनी समाजसेवा हिच ईश्वर सेवा मानुन कार्य करणाऱ्या कोरोना कालावधीत अन्नछत्र चालवणाऱ्या तसेच महिला भगिनी यांच्या प्रश्नांवर सतत आवाज उठवुन त्यांच्या न्याय हक्कांसाठी शासन आणि प्रशासन यांना धारेवर धरून महिलांच्या सक्षमीकरणासाठी कायम प्रयत्नशील असलेल्या किस्किंदाताई पांचाळ यांच्या कार्याची दखल घेऊन शाल श्रीफल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे विश्वस्त विवेकानंद सुतार, अध्यक्ष दिलिपजी सुतार, सचिव प्रकाशजी दिघे, सदस्य अनिकेत,अमृता क्षीरसागर,संतोष सुवर्णकार,सुनिल दिक्षित,रविंद्र परदेशी आदी उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांच्याकडुन शुभेच्छांचा वर्षाव.

सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या बीड जिल्ह्यातील महिलांची आर्थिक फसवणूक व त्यांच्यावरील दापदडप प्रकरणात तब्बल २ महिने मुंबईतील आझाद मैदान राज्य महिला आयोगाच्या सदस्याच्या मनमानी कारभारा विरोधात लढा देणाऱ्या किस्किंदाताई यांचे सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, शेख युनुस चऱ्हाटकर, बाल हक्क संरक्षण संघ जिल्हा सचिव सय्यद आबेद बीडकर, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे,बीड शहराध्यक्ष सादेक सय्यद यांच्यासह ईतरांनी “समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच सायं.दैनिक बीड अभिमान चे संपादक राजेंद्र होळकर,सामाजिक कार्यकर्ते विशिष्ट साबळे आदिंनी प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले.

जबाबदारी वाढल्याची जाणिव आहे-किस्किंदाताई पांचाळ.

सामाजिक क्षेत्रात महिलांच्या न्याहक्कासाठी लढत असताना मिळणारे पुरस्कार ऊर्जा,बळ देतात त्यामुळे जबाबदारी वाढल्याची जाणिव असून हिंतचिंतकाच्या शुभेच्छा, मार्गदर्शन आणि सहकार्याने भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते.

error: Content is protected !!