ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

मुंडे महाविद्यालयात आकाशकंदिल प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न…

मुंडे महाविद्यालयात आकाशकंदिल प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न…

 

कोकण संपादक / भरत सरपरे

 

मंडणगड सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष अंतर्गत महिला विकास कक्ष व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आणि श्री. मनोज मर्चंडे यांच्या सहकार्यातून नुकतेच आकाशकंदिल प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून माणदेशी फाऊंडेशन चिपळूण शाखेच्या श्रीमती प्रिया वरवडेकर व प्रमुख पाहुण्या म्हणून मंडणगड येथील सामाजिक कार्यकत्र्या सौ. चारुलता पारेख उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. राहूल जाधव होते. यावेळी सौ. सावी तांबे, दिप्ती रेगे, श्रध्दा लेंडे, प्रेरणा शेटये, सुनितादेवी चाळके, रोशनी मर्चंडे, किर्ती कोकाटे आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य प्रा. डॉ. राहूल जाधव यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तत्पूर्वी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर महिला विभागाच्या डॉ. संगीता घाडगे यांनी प्रास्ताविक करुन कार्यशाळेमागील उद्देश स्पश्ट केला. त्यानंतर सौ. सावी तांबे यांनी शासनाच्या विविध योजनांविषयी थोडक्यात माहिती दिली.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना सौ. चारुलता पारेख म्हणाल्या की,महाविद्यालयीन विद्यथ्र्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील असते. याचाच एक भाग म्हणून आज महाविद्यालयातील विद्यार्थीनी व मंडणगड परिसरातील महिलांसाठी आकाशकंदिल बनविण्याची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. सर्व महिला भगिनी व विद्याथ्र्यांनीनी या संधीचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले.
प्रमुख प्रशिक्षिका श्रीमती प्रिया वरवडेकर यांनी सर्व महिलांनी आपल्यातील सुप्त कला-कौशल्ये ओळखून अशा प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना चालना दयावी. व स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने उभे राहवे असे सांगितले. यावेळी त्यांनी विविध प्रकारच्या आकाश कंदिलांबाबत माहिती देऊन ते कसे बनवावेत याबद्दल उपस्थित महिला व विद्यार्थींनींना प्रशिक्षण दिले. यावेळी श्रीमती सुनितादेवी चाळके यांनी टाकावू वस्तूंपासून टिकावू वस्तू बनवण्याबाबत मार्गदर्शन केले.
अध्यक्षिय समारोप करताना प्राचार्य प्रा. डॉ. राहूल जाधव म्हणाले की, आज जागतिकीकरण व खाजगीकरणाच्या काळात दिवसेंदिवस नोक-यांचे प्रमाण खूपच कमी होत चालले आहे. अशावेळी आपल्याकडे असणा-या कला-कौशल्यांच्या आधारे विविध प्रकारचे प्रशिक्षण घेवून आपण आपला स्वतःचा छोटा-मोठा उद्योग-धंदा सुरू करू शकतो. कोरोनाकाळातही अनेक महिलांनी विविध प्रकारच्या उद्योगांद्वारे आपले कुटुंब सांभाळले आहे. महाविद्यालयीन युवतींसाठी महाविद्यालयात वेळोवेळी अशा प्रकारची प्रशिक्षणे आयोजित केली जातात. जेणेकरून त्यांना आपल्यामध्ये असलेल्या कला-कौशल्यांचा विकास करता येईल व आत्मनिर्भर होता येईल. सदर प्रशिक्षणाचा महाविद्यालयातील सर्व विद्यार्थींनींनी व उपस्थित महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमास महिला वर्ग व विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता डॉ. संगीता घाडगे, डॉ. अशोक साळुंखे, डॉ. ज्योती पेठकर, ग्रंथपाल दगडू जगताप, प्रा. प्राची कदम, सौ. अंकिता पाटील यांनी परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. अशोक साळुंखे यांनी मानले.

 

error: Content is protected !!