ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात संविधान दिनी “संविधान गौरव स्पर्धेचे” आयोजन…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात संविधान दिनी “संविधान गौरव स्पर्धेचे” आयोजन…

 

कोकण संपादक / भरत सरपरे

 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात २६ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त भव्य संविधान गौरव स्पर्धा ही संविधान निर्मात्याच्या मूळगावी आंबडवे या ठिकाणी आयोजीत करण्यात आली आहे अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे या स्पर्धेचे केंद्रप्रमुख सहा. प्रा. अरुण ढंग यांनी दिली.

या स्पर्धेच्या निमित्ताने नुरखा पठाण यांनी लिहिलेल्या “आपले संविधान” या पुस्तकाचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी आयोजीत कार्यक्रमात महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. अंशुमन मगर म्हणाले की,” सर्व विद्यार्थी व जनतेला संविधानाप्रति जागरूक करणे, त्यांच्यात संविधान विषयक चिकित्सा निर्माण करणे, प्रत्येक घरात संविधान पोहचवने, विद्यार्थ्यांना संविधानाचा अभ्यास करण्यास प्रवृत्त करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.”

या स्पर्धसाठी महाविद्यालयातून ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून इच्छूक व्यक्तीनी महविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन समन्वयक डॉ. अंशुमन मगर यांनी केले आहे.

error: Content is protected !!