ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात वाचनाची आवड निर्माण होणे आवश्यक आहे. – डॉ. राहूल जाधव डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ विविध उपक्रमानी साजरा…

प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात वाचनाची आवड निर्माण होणे आवश्यक आहे.
– डॉ. राहूल जाधव
डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ विविध उपक्रमानी साजरा…

 

कोकण संपादक / भरत सरपरे

मंडणगड : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, मराठी विभाग, सांस्कृतिक विभाग,विज्ञान अभ्यास मंडळ, कनिष्ठ महाविद्यालय व ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. शासनाने यावर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावाचे औचित्य साधून ‘अमृत महोत्सव भारतीय स्वातंत्र्याचा, उत्सव राष्ट्रभक्तीपर पुस्ताकांच्या वाचनाचा’ ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करण्यात आली होती. त्याप्रमाणे ‘दिनांक 1 आक्टोबर ते 15 आक्टोबर’ या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. राहूल जाधव होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर मराठी विभागाचे डॉ. धनपाल कांबळे, डॉ. संगीता घाडगे, डॉ. अशोक साळुंखे, डॉ. मुकेश कदम, प्रा. सुरज बुलाखे, प्रा. ज्ञानदेव गिते, प्रा. महादेव वाघ, प्रा. प्रमोद वासकर, प्रा. प्राची कदम, प्रा. प्रसन्न गवाणकर, ग्रंथपाल दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे संचालक श्री. विश्वदास लोखंडे यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर डॉ. संगीता घाडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर ग्रंथपाल दगडू जगताप यांनी महाविद्यालयीन विध्यार्थ्यामध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी तसेच वाचनाची आवड वृध्दींगत व्हावी या उद्देशाने या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगितले.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त दि. 8 आक्टोबर रोजी ‘वाचन मेळावा व परिसंवाद’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विध्यार्थ्यानी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी विनोद जोशी, सुयश भोसले, सरिन हसबुले, ऋतिका भोसले या विध्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले. उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांनी ‘वाचाल तर वाचाल’ ही संकल्पना त्याचे महत्व विध्यार्थ्याना सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अशोक कंठाळे यांनी केले तर आभार प्रा. ज्ञानदेव गिते यांनी मानले. तसेच दिनांक 11 आक्टोबर रोजी मुलांची ‘ग्रंथालय भेट’ अयोजित करण्यात आली होती. यावेळी मुलांनी ग्रंथालयामध्ये मुक्तपणे संचार करुन पुस्तकांचा आनंद घेतला. यावेळी प्राचार्य प्रा. डॉ. राहूल जाधव यांनी विध्यार्थ्याना विश्वकोश, संदर्भसाहित्य, नियतकालिके, अभ्यासक्रमावरील पुस्तके याविषयी थोडक्यात माहिती देवून प्रत्येकाने आपल्या मनात वाचनाची आवड निर्माण करावी असे सांगितले. शेवटी प्रा. महादेव वाघ यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. दि. 12 आक्टोबर रोजी ‘सामुहिक वाचन’कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामुहिक वाचन कार्यक्रमाचे आयोजन प्रा. प्रमोद वासकर, प्रा. प्राची कदम, प्रा. प्रसन्न गवाणकर यांनी केले होते. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. राहूल जाधव उपस्थित होते. यावेळी सर्व मुलांकडून सामूहिक वाचन करुन घेण्यात आले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. प्रमोद वासकर यांनी मानले. तर दि. 14 आक्टोबर रोजी लिखानाची आवड निर्माण व्हावी म्हणून निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेला विध्यार्थ्यानी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सदर स्पर्धेचे आयोजन प्रा. प्राची कदम यांनी केले होते. दि. 15 आक्टोबर रोजी ग्रंथालय विभागाच्या वतीने ‘ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर हे कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून लाभले. तर यावेळी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे संचालक विश्वदास लोखंडे यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी त्यांनी सांगितले की वाचन चळवळ वाढीला लागणे आवश्यक असून विद्यार्थी दशेत ध्येय निश्चित केल्यास व सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चीत मिळते. यावेळी उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांनी विध्यार्थ्यानी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे असे सांगून यामध्ये ग्रंथालयाची भूमिका महत्तवाची असल्याचे त्यांनी नमूद केले. सदर ग्रंथ प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ , मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या महाराष्ट्र शासनाच्या संस्थामार्फत प्रकाशित केलेले कोश, विविध खाजगी प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित केलेले साहित्य, चरित्र ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, कोश वाड्.मय, शब्दकोश, चरित्र ग्रंथ, व ललित साहित्य यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. सदर ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी घेतला.
विविध कार्यक्रमा अंतर्गत प्राचार्य प्रा. डॉ. राहूल जाधव विध्यार्थ्याना मार्गदर्शन करताना म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात वाचनाची आवड निर्माण होणे आवश्यक आहे. वाचनामुळे संस्कार व आपल्या विचारांना चालना मिळते यासाठी वाचनाची प्रेरणा निर्माण व्हावी या उदेदशाने हा दिवस आपण साजरा करीत आहोत. डॉ. अब्दुल कलाम यांनी बहुतांश पुस्तके विद्यार्थी व शिक्षकांसाठी लिहिली आहेत. प्रगत भारताचे डॉ. अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर विध्यार्थ्यानी विविध विषयाचे वाचन करुन सुसंस्कारीत होणे गरजेचे आहे. विध्यार्थ्याना व शिक्षकांना नेहमी ज्ञान आणि विचारासह जगण्याची, वागण्याची, कृती करण्याची प्रेरणा ही पुस्तकांमुळे मिळू शकते. म्हणून वाचन संस्कृती टिकवायची व वाढीस लावायची असेल तर विद्याथ्र्यांमध्ये वाचनाचे महत्व पटवून देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता, प्रा. धनपाल कांबळे प्रा. महादेव वाघ, प्रा. अशोक कंठाळे, ग्रंथपाल श्री. दगडू जगताप यांनी परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. संगीता घाडगे यांनी मानले.

error: Content is protected !!