ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

मुंडे महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न…

मुंडे महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न…

 

कोकण संपादक / भरत सरपरे

मंडणगड येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ,जालगाव, -दापोलीच्या विविध शाखांच्या माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन संस्थेच्या वतीने लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात नुकतेच करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाचे आयुक्त मा. डॉ. प्रशांत नारनवरे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर दादा इदाते होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे(बार्टी) महासंचालक मा. श्री. धम्मज्योती गजभिये, समाजकल्याण, कोकण विभागाच्या विभागीय उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे, समाजकल्याण विभाग रत्नागिरीचे सहायक आयुक्त श्री. यादवराव गायकवाड, जातपडताळणी विभाग रत्नागिरीचे उपायुक्त श्री उमेश घुले, महाराष्ट्र राज्य बंजारा क्रांतीदलाचे अध्यक्ष देवीदास राठोड, उद्योजक श्री. नितीन कवितके, डोंबीवली येथील बांधकाम व्यावसायिक श्री. राहूल शेलार, भाजप मुरुबाड ग्रामीणचे अध्यक्ष श्री. आत्माराम विशे, संस्थेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. संपदाताई पारकर, कार्याध्यक्ष श्री. श्रीराम इदाते, संचालक श्री. रवींद्रकुमार मिश्रा, संचालक व चेअरमन शालेय समिती आंबडवे हायस्कूल श्री.आदेश मर्चंडे, श्री. संतोष चव्हाण , मंडणगड नगर पंचायत उप नगराध्यक्ष व संचालक श्री. वैभव कोकाटे, श्री. सुनिलभाई मेहता, संस्थेचे सर्व नवनिर्वाचीत संचालक, तसेच विविध शाखांचे प्रमुख, पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या पुतळयास मा. डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते पुश्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर दादा इदाते यांचे स्वागत केले. तर उपस्थित मान्यवरांचे कर्मवीर दादा इदाते यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यानंतर संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. श्रीराम इदाते यांनी संस्थेच्या कार्याचा थोडक्यात परिचय करुन दिला. डॉ. भरतकुमार सोलापुरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन दिला.
यावेळी मंडणगड व दापोली परिसरातील संस्थेच्या प्रमुख शाखांतील विविध क्षेत्रात कार्यरत असणा-या माजी विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अॅड. अभिजीत गांधी, महेश चिले, अल्पेश मर्चंडे, शुभांगी लोखंडे, मनोज चव्हाण, तायक्वांदो अंतरराराष्ट्रीय खेळाडू व पंच तेजकुमार लोखंडे, हुतात्मा तुकाराम बबन भोईटे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,कुंबळेचे माजी विद्यार्थी डॉ. अनिल पाटील, प्रा. योगेश लोखंडे, चंद्रशेखर शिंदे, सुचिता घाणेकर, गणेश बिल्लार, आंबडवे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलचे माजी विद्यार्थी प्रा. अल्पेश सकपाळ, माजी उपनगराध्यक्ष राहूल कोकाटे, आदित्य पोटसुरे, असोंड येथील संत गाडगेबाबा भटके-विमुक्त माध्य. आश्रमशाळेचे विशाल डांगे, तसेच हुतात्मा काशिनाथ वासुदेव रसाळ भटके-विमुक्त प्राथमिक आश्रमशाळा, असोंडचे माजी विद्यार्थी नेहा देवकर, अनामिका म्हस्के, नीलम साळुंके यांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
संस्थेच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाल्याब्दल महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाचे आयुक्त मा. डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते सौ. संपदाताई पारकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना मा. डॉ.प्रशांत नारनवरे यांनी सांगितले की, कर्मवीर दादा इदाते यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. केंद्र व राज्य शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना वेळोवेळी सन्मानितही केले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कार्याशी बांधिलकी ठेवून कठोर परिश्रम केले तर त्यामध्ये निपूणता येईल व आपल्या जीवनामध्ये यशस्वी होता येईल. जगामध्ये संधींची कमतरता नसुन ते साध्य करायचे असेल तर आपले प्रयत्न आवश्यक आहेत. जातीचा व जात पडताळणीचा दाखला देण्याच्या प्रक्रियेमध्ये आता सुलभीकरण करण्यात आले असून प्रत्येक शाळा-महाविद्यालयामध्येच सदरचे दाखले देण्याची अंमलबजावणी केली जाणार आहे असे ते म्हणाले. यावेळी श्री. धम्मज्योती गजभिये यांनी समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने काम केल्यास आपण नक्कीच परिवर्तन घडवू शकतो असे सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना मा. दादा इदाते यांनी सांगितले की वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन सामाजिक व शैक्षणिक कार्याची सुरूवात केली असून संस्थेच्या माध्यमातून विविध शासकीय अधिक-यांकडे पाठपुरावा करून वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. प्रत्येक समस्येला आव्हान मानून त्यांची सोडवणूक करणे गरजेचे आहे. समस्येच्या मुळाशी जाताना मूळ तत्व व सत्व सोडता कामा नये. मा. डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी वंचितांना विविध शासकीय सवलती मिळवून देण्यासाठी झटत आहेत हे पाहून समाधान वाटले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व नाना फडणवीस हे दोघेही मंडणगडचे वैशिष्टये असून त्यांनी संपूर्ण जगाला ज्ञान दिले आहे. थोर व्यक्तींची नावे घेणे सोपे असते पण त्यांच्याप्रमाणे आचरण करणे आवघड असते असेही त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम
यशस्वी करण्यसाठी प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, कुंबळेचे मुख्याध्यापक श्री. सुनिल घाणेकर, आंबडवेचे मुख्याध्यापक श्री. भास्कर जायभाये, असोंडच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा कदम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संगीता घाडगे यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. भरतकुमार सोलापुरे यांनी मानले.

error: Content is protected !!