ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

ओंकार रापतवार यांच्या बॉम म्युझिक स्कुलचे मान्यवरांच्या हस्ते होणार ५ नोव्हेंबर ला उद्घाटन 

ओंकार रापतवार यांच्या बॉम म्युझिक स्कुलचे मान्यवरांच्या हस्ते होणार ५ नोव्हेंबर ला उद्घाटन

अंबाजोगाई (प्रतिनिधी)-संगीत क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान मिळवून शहरातील संगीतप्रेमी मुलांना पिढीजात संगीत वाद्दासह उच्च तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकसीत झालेल्या संगीत वाद्यांचे अत्याधुनिक पद्धतीने शिक्षण देणारी बॉम म्युझिक स्कुल या पहिल्या म्युझिक स्कुलचे उद्घाटन ५ नोव्हेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
    अल्पावधीतच संगीतातील उच्च शिक्षण घेऊन अंबाजोगाई शहराचे नांव संगीत क्षेत्रात संपुर्ण देशभरात पोहंचवणा-या प्रख्यात संगीतकार ए. आर. रहेमान यांच्या मार्गदर्शनाखाली संगीताचे उच्च शिक्षण घेवून संगीत क्षेत्रात आपली नवी ओळख निर्माण केलेल्या ओंकार सत्येंदु रापतवार याने अंबाजोगाई शहरात ही अत्याधुनिक संगीत सृकुल सुरु करण्याचे धाडस केले आहे.
येथील छत्रपती संभाजी राजे चौकातील सोनवणे कुशन शेजारी भव्य इमारतीत उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक बॉम म्युझिक स्कुलचे उद्घाटन ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी आमदार संजय भाऊ दौंड, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, माजी उपनगराध्यक्ष मनोज लंकेला, ज्ञानप्रबोधिनी चे प्रसाद दादा चिक्षे, प्रख्यात संगीत शिक्षक तथा तबला अकादमीचे संचालक प्रकाश बोरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ओंकार रापतवार यांची आई कल्पना आणि आजी चंद्रकला यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
   या कार्यक्रमास शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य, इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे प्राचार्य, संगीत विद्यालयाचे संचालक, डॉक्टर, प्राध्यापक, विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार, वकील, व्यावसायिक आणि सर्व पालकांनी अंबाजोगाई शहरात सुरू करण्यात येणाऱ्या या नव्या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहुन आशिर्वाद द्दावेत असे आवाहन संचालक ओंकार सत्येंदु रापतवार, वैभवी सत्येंदु रापतवार आणि रापतवार परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
error: Content is protected !!