ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

चेहऱ्याकडे बघून भेदभाव करण्याची मानसिकता बदला

 

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे महिला आयोग आता आक्रमक झाला आहे. काल भिडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीनंतर एक महिला पत्रकार त्यांची प्रतिक्रिया विचारायला गेली. तिला पाहून संभाजी भिडे म्हणाले, आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन, असे ते म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर काॅंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी भारत जाेडाे यात्रेतील सहभागाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांना भिडे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, महिलांचे काम आणि त्यांचे कर्तृत्व बघा. केवळ त्यांच्या चेहऱ्यांकडे बघून भेदभाव करण्याची मानसिकता बदला, असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी भिडे गुरुजी यांच्यावर टीका केली.

महिलांना ऑब्जेक्टिव्ह म्हणून बघणे बंद करा. अमुक गाेष्ट करा म्हणून सांगणारे हे काेण आहेत? भाजपचे लोक आम्हाला देशप्रेमाबद्दल सांगतात. आमचे देशप्रेम हृदयात आहे. आम्हाला दाखवायची गरज नाही. भाजपच्या लाेकांनी महिलांबद्दलची मानसिकता बदलावी. हे लाेक महिलांचे काम आणि कर्तृत्व बघत नाही. केवळ त्यांच्या चेहऱ्यावर बघून विधाने करतात. या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत, असेदेखील शिंदे म्हणाल्या.

error: Content is protected !!