ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

भोकरदन नगर परिषद मुख्याधिकार्‍याची दबंगगीरी

 भोकरदन नगर परिषद मुख्याधिकार्‍याची दबंगगीरी
 भोकरदन प्रतिनिधी ;-आणणास विनंती करण्यात येते की, साखळी उपोषण मागे घेण्यासाठी संबधीत मुख्याधिकार्‍यांनी आता पर्यंत अनेक मार्गाने कार्यकर्त्यांवर दबाव आणलेला आहे.आता ग्रामपंचायत निवडणुक आचारसंहितेचा नगरपरीषद समोरील उपोषणाशी कोणताही संबध नसतांना आचारसंहिता भंगबाबत कार्यवाही करण्याच्या धमकीचे पत्र दिलेले आहे.ठेका रद्द करा आणि काम न केल्यामुळे मागील दिलेला पैसा वसुल करा. हि मागणी केल्यामुळे ठेकेदाराची पाठराखण करण्यासाठीच यांना साखळी उपोषण थांबवायचे आहे.कोणाच्या जीवावर कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत ?
सविस्तर —-
  भोकरदन शहराच्या साफसफाईसाठी आम आदमी पार्टिचे साखळी उपोषण दि 10/10/2022 पासुन चालु आहे.फक्त एकच मागणी आहे शहराची स्वच्छता करा.
पान 2
 अनेक महिन्यापासुन साफसफाई झालेली नाही त्यामुळे नाल्या साचल्या आहेत गटारे तुंबले आहेत ठीकठीकाणी कचरर्‍याची ढिगारे झालेली आहेत. साफसफाईचे काम ठेकेदाराला देण्यात आलेले आहे.त्यामध्ये रहिवाशी वस्तीत एक वेळ व मार्केट मध्ये दररोज तीन वेळा साफसफाई करण्याचा करार ठेकेदारा बरोबर झालेला आहे. असे असतांना जनतेचा पैसा दररोज खर्च होतो परंतु साफसफाईचे काम कराराप्रमाणे होत नाही. काम जर होत नाही तर ठेकेदाराला पैसा कश्याचा देण्यात येतो?
 स्वच्छतेचे धडे देणारे तहसिल कार्यालय पंचायत समिती कार्यालय,गटशिक्षणाधिकारी कार्यालय, बस स्टॅंड घाणीच्या विळख्यात आहे.
साफ सफाईच्या कामावर फक्त कागदोपत्री महिन्याला लाखोरुपये खर्च होत आहे. ठेकेदार व अधिकारी यांची
 “तुम्ही आम्ही भाऊ वाटुन खाऊ”
 हा उद्योग सुरु आहे.
भोकरदन शहरात सार्वजनीक ठीकाणी मुत्र्यांची तसेच सार्वजनीक शौचालयाची कुठेच सोय नाही कुठेही कचराकुंडी आढळुन येत नाही.कचरा व घाण याची योग्य विल्हेवाट न लावता नदीच्या पात्रात टाकल्या जाते.त्यामुळे आपल्या प्रसिध्द असलेल्या केळणा
पान 3
 नदीला गटाराचे स्वरुप आलेले आहे.पाणी दुषीत झालेले आहे.या दुषीत पाण्याचा प्राणी तसेच वनस्पतींवर व नदीकाठी असणारर्‍या गावांवर वाईट परीणाम होत आहे. कुत्रे डुक्करे यांची संख्या भरपुर आहे. यांचा नागरीकांना त्रास होतो.नागरीकांच्या दिलेल्या निवेदनावर कोणताही विचारा होत नाही.अनेक निवेदने तसेच पडुन आहेत.”स्वच्छ भारत मिशन” हा उपक्रम नगरपरीषदेने धाब्यावर बसवला आहे.या उपक्रमासाठी आलेला निधी जातो कुठ ? हा खरा प्रश्न आहे.
.नगरपरीषदेचा अनागोंदी कारभार आहे आधिकारी कर्मचारी कधीही येतात कधीही जातात गैरहजर राहतात त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. प्रचंड भ्रष्टाचार आहे नागरीकांचे कोणतेच काम अनेक चकरा मारल्या शिवाय व पैशे दिल्या शिवाय होत नाही. जनता त्रस्त झालेली आहे.शिक्षण, आरोग्य,स्वच्छता,पिण्याचे स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेले पाणी इ. मुलभुत सोई सुध्दा नगर परीषदने दिलेल्या नाहीत. शहरात घाण साचलेली तशीच आहे.आपण संबधीत एजंन्सीला काम न करता पैसा का देत आहात ? शहरात प्रत्यक्ष कामाची पाहणी आपण करत नाहीत.संबधीत एजंसी आपल्या अकार्यक्षमतेमुळे जनतेच्या पैशाची लुबाडणुक करत आहे आणि करारातील अटींचे पालन करत नाही.
पान 4
सबब आपण संबधीत एजंन्सीचा ठेका तात्काळ रद्द करावा. व मागील दिलेला पैसा वसुल करावा. साफसफाईकडे लक्ष न देता या मागण्या केल्यामुळेच संबधीत मुख्याधिकारी कार्यकर्त्यांना धमक्याची पत्रे देत आहेत.  असे जालना जिल्हा उपाध्यक्ष आम आदमी पार्टीचे
बोरशे गुरूजी भोकरदन नी बोलताना सांगितले
error: Content is protected !!