ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

“डॉ उमेश जाधव यांच्यासारखा देव माणूस प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मदतीला धावून येवो…”

“डॉ उमेश जाधव यांच्यासारखा देव माणूस प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मदतीला धावून येवो…”

प्रतिनिधी  जालना:-   तिर्थपुरी येथे झालेल्या समाजभान दशकपूर्ती सोहळ्यामध्ये कृष्णा खरात या मुलाचे वडील आपल्या मुलाची शस्त्रक्रिया मोफत करावी म्हणून भेटीस आले होते. त्याच्या डाव्या हाताचे दोन्ही हाड तुटलेले होते. त्याचे ऑपरेशन कुठल्या योजनेतही होत नव्हते. हाड मोडल्यामुळे मुलाला खूप वेदना होत होत्या. मेळाव्यासाठी आलेले समाजभानचे स्वयंसेवक आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मराठवाड्याचे डॉक्टर सेलचे डॉक्टर उमेश जाधव यांना संबंधित मुलाची माहिती देताच त्यांनी तात्काळ दीपक हॉस्पिटल त्याला बोलावून घेतले. त्याच्या सर्व तपासण्याही मोफत केल्या. तसेच ज्या शस्त्रक्रियेसाठी 50 ते 60 हजार रुपये खर्च होता ती शस्त्रक्रिया त्यांनी मोफत केली. शस्त्रक्रिया झाल्यामुळे आज त्याला वेदनेतून मुक्ती मिळाली आणि आज त्याच्या आणि त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर डॉ उमेश जाधव यांच्यामुळे आनंद दिसू लागला.
आपल्या मुलावर झालेल्या या मोफत शस्रक्रियेसाठी खरात कुटूंबियांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री सहायता कक्षचे मंगेशजी चिवटे यांचेही आभार मानले.
तर या मुलावर उपचार करण्यासाठी मराठवाडा कक्षप्रमुख दादासाहेब थेटे, सोशल मीडिया प्रमुख आकाश चापकानडे आणि दीपक हॉस्पिटलच्या सर्व मेडीकल स्टाफचे आभार मानले.
“डॉ उमेश जाधव यांच्यासारखा देव माणूस प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मदतीला धावून येवो…” असा आशीर्वाद या मुलांच्या आईने डॉक्टरांना दिला.
error: Content is protected !!