ब्रेकिंग न्युज
आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

न्यायालयात जाण्याऐवजी आपसांत तडजोड करून तंटे मिटवा – खेड वकील असोसिएशनचे अध्यक्ष नवनाथ गावडे

राजगुरूनगर :
खेड तालुक्यातील कहु कोयाळी येथे खेड तालुका विधी समिती, राजगुरुनगर बार असोसिएशन व ग्रामपंचायत कहुकोयाळी यांच्या वतीने खुले कायदेविषयक जनजागृती शिबीराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष नवनाथ गावडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी सर्वाना आवाहन केले कि, लोकांनी आपसांत वाद मिटवले तर कोर्टात जाण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे लोकांचा पैसा व वेळ वाचेल, त्यामुळे मिळालेले समाधान मोठे असेल व गावातील एकोपा टिकून राहील. त्यानंतर सातबारा उतारा या विषयावर ॲड अरुण मुळूक यांनी मार्गदर्शन केले. खरेदीखत करताना घ्यावयाची काळजी या विषयाबाबत ॲड चंद्रकांत सांडभोर यांनी मार्गदर्शन केले. लिगल अवेरनेस या विषयावर मार्गदर्शन करताना महिलांचे कायदेशिर हक्क व अधिकार याबाबत मार्गदर्शन ॲड माणिकराव पाटोळे यांनी केले. उकृष्ट पद्धतीने मार्गदर्शन मिळाल्याबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी गावचे सरपंच सुरेश केदारी, उपसरपंच व खेड बारचे विद्यमान उपाध्यक्ष ॲड संतोष दाते, माजी अध्यक्ष ॲड सुभाष कड पाटील, ग्रामसेवक रोकडे मॅडम, ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा वाढाणे, कुंदा केदारी अंगणवाडी सेविका यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत वाढाणे यांनी केले व उपसरपंच ॲड संतोष दाते यांनी उपस्थितांचे आभार मानले.

error: Content is protected !!