ब्रेकिंग न्युज
अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणार

ACB च्या नोटिशीनंतर आमदार राजन साळवींची पहिली प्रतिक्रिया

 

एकीकडे उद्धव ठाकरे गट फुटत असताना दुसरीकडे मात्र शिल्लक गटाच्या नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणा नोटिसा धाडत आहे अशातच उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना ACB ने नोटीस धाडली आहे यावर आता साळवी यांनी प्रतक्रिया दिली आहे.

एसीबीकडून आलेली नोटीस ही दबावाची कारवाई सुरू असून तुरुंगात गेलो तरी उद्धव ठाकरेंसोबत कायम असणार असल्याचे आमदार राजन साळवी यांनी म्हटले.

शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यानंतर राजापूरचे आमदार राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस बजावल्यानंतर पुन्हा एकदा दबावाच्या राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे. एसीबीच्या नोटिशीनंतर आमदार राजन साळवी यांनी आज पत्रकार परिषद घेत तुरुंगात डांबले तरी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचे सांगितले. आपण मातोश्रीशी एकनिष्ठ असल्यामुळेच ही नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. या नोटिशीमागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचाही आरोप त्यांनी केला.

error: Content is protected !!