ब्रेकिंग न्युज
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताहपारगाव सिरस येथे बैलगाडी शर्यतीमध्ये आली रंगत ..!वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊत

भाजप नेत्यांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हे दाखल करा, भीम आर्मीची मागणी

 

महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने केल्यामुळे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. याचदरम्यान भीम आर्मीने आक्रमक भूमिका घेत मुंबई सत्र न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार राम कदम, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या भाजप नेत्यांविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत निर्देश देण्याची विनंती सत्र न्यायालयाला केली आहे. याप्रकरणी मंगळवारी सुनावणी होणार असून भाजप नेत्यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महात्मा जोतिबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने केली. या पार्श्वभूमीवर भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी शनिवारी सत्र न्यायालयात धाव घेऊन फौजदारी अर्ज दाखल केला. या अर्जामध्ये चंद्रकांत पाटील यांचा मुख्य आरोपी म्हणून उल्लेख केला आहे.
.
.तसेच त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करूनही अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे घाटकोपरचे आमदार राम कदम, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर व इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांवरही भादंवि कलम आणि अॅट्रॉसिटी कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. शवारी अशोक कांबळे यांच्या वतीने अॅड. नितीन सातपुते यांनी विशेष सत्र न्यायाधीश ए. पी. कानडे यांच्यासमोर फौजदारी अर्ज दाखल केला. न्यायाधीशांनी या अर्जाची गंभीर दखल .घेतली आणि सुनावणी मंगळवारी घेणार असल्याचे जाहीर केले.
..

error: Content is protected !!