ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

कर्नाटक सरकार मुजोरी करतंय, महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं घोरतंय”

हिवाळी अधिवेशनच्या पहिल्या आठवड्याचा आज शेवटचा दिवस आहे. गुरुवारी सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळे आजच्या कामकाजात सभागृहात भाग घ्यायचा की नाही याबाबत विरोधक बैठकीत ठरवतील.परंतु सत्ताधाऱ्यांकडून सोयीचं राजकारण सुरू असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला. तर, सभागृहाचं काम सुरू होण्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवन पायऱ्यांवर उतरत शिंदे सरकार आणि कर्नाटक सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

बेळगाव कारवार आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे… बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… सरकार हमको दबाती कर्नाटक को घबराती है… कुंभकर्णाने घेतलं झोपचं सोंग, तिकडे कर्नाटक सरकार मारतंय बोंब… कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध… लोकशाहीचा खून करणार्‍या सरकारचा धिक्कार असो…कर्नाटक सरकार मुजोरी करतंय, महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं घोरतंय…सीमा प्रश्नी भूमिका घ्या नाहीतर खुर्च्या खाली करा… भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो… अशा घोषणांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला आहे. यावेळी, काळ्या पट्टया बांधून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, भाजपच्या आमदार आणि विद्यमान विधानसभा सदस्य मुक्ता टिळक यांचे गुरुवारी निधन झाले. त्यामुळे, आज विधानसभेत त्यांना श्रद्धांजली वाहून आजचे विधानसभा कामकाज बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती आहे. मात्र, तत्पूर्वीच विरोधक कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावरुन आक्रमक झाल्याचे दिसून आले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आक्रमक पवित्रा घेत माध्यमांसमोर भूमिका मांडली.

error: Content is protected !!