ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

झालं इलेक्शन.. आता जपा रिलेशन……!

झालं इलेक्शन.. आता जपा रिलेशन……!
केज!नंदकुमार मोरे-ग्रामपंचायत निवडणूका संपन्न झाल्या, काहींचा दणदणीत विजय झाला काहींचा दारुण पराभव होईल तर कोणी काटावर निवडून आले तर कोणी थोडक्यात अपयशी झाले, काहींनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली यात काही यशस्वी झाले तर काही अपयशी.गावकीचं राजकारण फार बेकार असते.
सत्तेचा सारीपाट हा गेली एक महिन्यापासून आपण आप आपल्या गावात अनुभवला, निवडून येण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवणे, आलेल्या सणाचा ही उपयोग करून घेणे,प्रचार प्रभावी कसा होईल यासाठी वाटेल ते करणे यामुळे नकळत आपलेच आपल्या विरोधात गेले, कोण ह्या वार्डात तर कोण विरोधी वार्डात घरातली, रक्ताची नाती प्रतिस्पर्धी बनली, एकमेकांचे उणेंदुणे काढून आपण याच्यापेक्षा कसा प्रभावी उमेदवार आहे हे पटवून देण्यात आले.
उमेदवारांनी दिवसाची रात्र केली, ढाबे, पाय रंगल्या, विकासकामांचे जाहिरनामे, विकासाची वचनपूर्ती, वेगवेगळ्या चालीवरती बसवलेली टेक्नॉलॉजी च पुरेपूर फायदा घेत प्रत्येकाने यशस्वी होण्यासाठी पराकाष्ठा केली आहे.
गुलाल कुणाचाही असो सर्व माणसं आपल्याच गावातील आहेत, आपलीच आहेत, कोणताही विजय किंवा पराजय हा अंतिम नसतो, शांत रहा संयमी रहा, मागील 15 दिवसात ज्या लोकांना हात जोडत होता त्यांना त्रास होईल असे न वागता, गावच्या सर्वांगीण विकासासाठी तरुण पिढीच्या भवितव्यासाठी राग, विरोध, द्वेष विसरून एक होणे गरजेचे आहे, आपल्या कर्तृत्वाने प्रभुत्व निर्माण होईल नि नेतृत्वाची धुरा नक्कीच तुमच्या हातात येईल म्हणूनच झालं इलेक्शन आता जपा रिलेशन हे ध्यानात ठेवून सर्वांगीण विकासासाठी भविष्यात एकत्र येण्याची गरज आहे. आणि ती प्रत्येक गावात जपली पाहिजे.
error: Content is protected !!