ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

राजे प्रतिष्ठानच्या मंडणगड च्या वतीने खेळाडूंचा गौरव…

राजे प्रतिष्ठानच्या मंडणगड च्या वतीने खेळाडूंचा गौरव…

 

कोकण संपादक – भरत सरपरे

मंडणगड तालुक्यात कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतीक क्षेत्रात काम करत असताना राजे प्रतिष्ठान मार्फत क्रीडाक्षेत्रात मंडणगड तालुक्याचा नावलौकिक करणारी कु. विधी सचिन चांदिवडे हीचा सन्मान करण्यात आला.
जिल्हा स्तरावर 100 मी धावणे प्रथम क्रमांक,200 मी धावणे द्वितीय क्रमांक व लांब उडी प्रथम क्रमांक या स्पर्धेत सर्वोच्च यश तीने संपादन केले. राजे प्रतिष्ठान मार्फत नेहमीच तालुक्यातील प्रत्येक क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान करण्यात येतो व या सर्व क्रीडापटूंना भविष्यात देखील सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. योगेश जाधव यांनी केले. या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. योगेश जाधव, जयराम राठोड, प्रजोद गांधी , राजू पटेल तसेच नवी दिशा स्पोर्ट्स अकॅडमी मंडणगड व कु. विधी चांदिवडे हीचे प्रशिक्षक श्री. प्रविण भुवड व पालक उपस्थित होते.

error: Content is protected !!