ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतक-यांना खते खरेदी करताना होत असलेली अडवणूक व तसेच शेतक-यांना विम्याची रक्कम लवकरात लवकर देण्यात यावी..- संजय पौळ

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभूते

उत्तर सोलापूर तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात नैसर्गिक अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांची संपूर्ण पिके त्यांच्या डोळयासमोरच पाण्यात गेली आहेत. असे असताना शासनाकडून तोकडी स्वरूपाची मदत मिळालेली. नुसती आकडेवारीच जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील 90 टक्के शेतक-यांनी पिक विमा भरलेला असून सलग तिन महिने सतत पाऊस अतिवृष्टी झाली त्याची तक्रार विमा कंपनीला केल्यानंतर रितसर आपल्या अधिका-या मार्फत व कृषी अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक अशा त्रिसदस्सीय समीतीने अहवाल पंचनामे करून विमा कंपनी अधिकारी व त्रिसदस्सीय समीतीने अहवाल सादर करून शासनाने सुध्दा अतिवृष्टीची रक्कम नुसतीच जाहीर केलेली आहे ती शेतक-यांना आजतागायत मिळालेली नाही. व विम्याची रक्कम ५० टक्के शेतक-यांना मिळाली. उर्वरीत शेतक-याना ती मिळालीच नाही. काही शेतक-यांना क्षेत्र १ हे असो किंवा ३ हे असो रु.३०५९/- एवढीच रक्कम मिळाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय पौळ यांनी याबाबत आवाज उठवीत शेतक-यांना विम्याची रक्कम लवकरात लवकर देण्यात यावी असे निवेदन जिल्हा कृषी अधिकारी सोलापूर यांना देण्यात आले.
तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतक-यांना खते खरेदी करीत असताना खत दुकानदाराकडून आवश्यक असलेले खत खरेदी करताना जबरदस्तीने शेतकऱ्यांकडून रू. 1000/- ते रू.1200/- किंमतीची इतर औषधे खरेदी केल्याशिवाय आवश्यक असलेले खते देत नाहीत. अशा प्रकारची आर्थिक पिवळणुक जाणीवपूर्वक केली जात आहे. आगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांना खते खरेदी करीत असताना सुद्धा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे शेतक-यांना खते घेताना अडवणुक व जबरदस्तीने औषधे घेण्यासाठी जबरदस्ती करणा-या दुकानदारांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी तसेच विम्याची रक्कम ज्यांना मिळालीच नाही आणि ज्या शेतक-यांना नुकसान भरपाई मिळाली नाही अशा शेतक-यांना येत्या आठ दिवसात ती रक्कम मिळावी. अन्यथा शिवसेना जिल्हा प्रमुख गणेशदादा वानकर व उपजिल्हा प्रमुख विक्रांत काकडे यांच्या मार्गदर्शनाखालील उत्तर सोलापूर शिवसेना तालुका प्रमुख संजय पौळ यांच्या नेतृत्वाखालील तहलिसदार, उप जिल्हाअधिकारी क्र.१. जिल्हाधिकारी सोलापूर, जिल्हा कृषिअधिकारी सोलापूर या सर्व ठिकाणी शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल त्यावेळी होणा-या परीस्थितीला वरील अधिकारी जबाबदार राहतील. अशा प्रकारचे निवेदन शिवसेना तालकाप्रमुख संजय पौळ यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना दिले.
यावेळी, शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख परिणीती शिंदे, उपतालुकप्रमुख उपतालुका प्रमुख अच्युतराव बाभळे, उपतालुकाप्रमुख सदाशिव सरगर, उपतालुका प्रमुख सचिन घोडके, ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र घाटे, युवासेना तालुका प्रमुख अजिंक्य देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दिपक क्षीरसागर, युवासेनेचे विकास मुगळे, प्रसिध्दी प्रमुख प्रशांत चव्हाण यांसह उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!