ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

रत्नागिरीत १५ जानेवारीपासून मनसेच्या गाव तिथं शाखा अभियानाला सुरवात

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात “गाव तिथं शाखा” हे अभियान राबवण्यात येणार आहे. काही महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा-परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव पातळीवर पक्ष अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबवण्यात येणार असून या अभियानाचा मनसेला नक्कीच फायदा होणार आहे.

या उपक्रमासाठी जिल्हा अध्यक्ष, जिल्हा सचिव, तालुका अध्यक्ष, तालुका संपर्क अध्यक्ष व मुंबईतील कोकणातील मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक हे आप-आपल्या गावी जाऊन हे अभियान अधिक सक्षमपणे राबवणार आहे. या अभियानाची सुरवात १५ जानेवारी २०२३ पासून सर्व गाव पातळीवर राबवण्यात येणार आहे अशा सूचना संपर्क अध्यक्ष सतीश नारकर यांनी दिल्या आहेत.

या संदर्भात आज दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी रायगड येथे तालुका संपर्क अध्यक्ष व जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर यांची बैठक पार पडली तसेच त्यांना आपल्या आपल्या तालुक्यात जाऊन तालुका निहाय बैठकी लावण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत या उपक्रमामुळे गाव पातळीवर सुद्धा मनसे पक्ष अधिक मजबूत होण्यास मदत मिळणार आहे.

error: Content is protected !!