ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

देशाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, वाचा काय आहे गिफ्ट

 

नवी दिल्ली | देशातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल् आहेत. यंदाच्या बजेटमध्ये केंद्राने अंक भेटवस्तू दिल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्रशिक्षण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. श्री अन्न योजना सुरू करण्यात आली असून कृषी क्षेत्रासाठी भांडार क्षमता वाढवणार आहोत. तर इंडियन मिलेट्स इन्स्टिट्यूटची स्थापना केली जाईल.

तसेच कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसंच शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणार सुरु करण्यात येणार असून विकास क्लस्टरही योजनाही राबवली जाणार आहे. तसंच शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.हैदराबादमधील श्रीअन्न संशोधन संस्थेला केंद्र सरकारकडून विशेष आर्थिक मदत केली जाणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलं.

त्याचप्रमाणे 63 हजार प्राथमिक कृषी क्रेडिट सोसायट्यांचं संगणकीकरण करण्यात आलं आहे. राष्ट्रीय सहकार डेटाबेस तयार करण्यात आहे. आता देशभरात मोठ्या प्रमाणावर विकेंद्रीत स्टोरेज सुविधा निर्माण करण्यात येतील असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आयुष, मत्स्य, पशुपालन, डेअरी, सहकार अशा मंत्रालयांची स्थापना केल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलं. मत्स्य विकासासाठी 6 हजार कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे

error: Content is protected !!