ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

अन दिघे साहेब सांगून गेले गद्दारांना क्षमा नाही. ठाणे कळवेकर हे कधी विसरणार नाही… ठाण्यात जोरदार बॅनरबाजी

 

बँनरवरून वरून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिंदे गटात चांगलेच राजकारण तापले आहे. बॅनरबाजी करत एकमेकांवर अप्रत्यक्षपणे टोलेबाजी करणे सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी कळव्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आली होती. त्या बॅनरवर असे लिहिले होते की, खोका बोका, नगरसेवकांनो स्वत: ला विकू नका, गद्दारी जनता माफ करणार नाही, असे लिहून या बॅनरबाजीतून शिंदे गटावर राष्ट्रवादीने अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

राष्ट्रवादीच्या या टिकेनानतंर लगेचच शिंदे गटाकडूनही प्रत्युत्तर देत बॅनर लावण्यात आले होते. या बॅनर मध्ये ‘लबाड ‘बोका’ ढोंग करतोय’ असे लिहिले होते. हे सगळे जागरूक नागरिकांच्या माध्यमातून शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये अप्रत्यक्ष सुरू असलेले बॅनर युद्धामध्ये आज पुन्हा एकदा तिसरा बॅनर समोर आलेला आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि कळवा मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळव्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कोट्यावधी रुपये आणि करोडो रुपयांचा निधी देण्याचे आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे. आणि दुसरीकडे कळव्यात या बॅनरबाजीचे युद्ध सुरू आहेत.

अशातच तिसरा बॅनरसुद्धा झळकला आहे. या तिसऱ्या बॅनरमध्ये ‘J A म्हणतच नाही त्याने केला विकास, आम्हीच म्हणतो कळवा होता भकास त्याच्यामुळे झाला विकास. दिघे साहेब सांगून गेले गद्दारांना क्षमा नाही. ठाणे कळवेकर हे कधी विसरणार नाही, असा टोला या बॅनरच्या माध्यमातून लगावण्यात आला आहे; परंतु रात्री लावण्यात आलेले हे बॅनर आता पहाटे पर्यंत उतरवण्यात आले आहेत. अजूनही हे बॅनर कोणी उतरवले हे मात्र स्पष्ट झालेले नाही. बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलेली बोचरी टीका शिंदे गटाला चांगलीच लागली आणि म्हणून हे बॅनर काढले असल्याची चर्चा सध्या कळव्यात रंगली आहे.

error: Content is protected !!