ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

अखेर भाजपकडून पुण्यातील पोट निवडणुकीसाठी यान दोन नावाची घोषणा

 

भारतीय जनता पक्षाने पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुकांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपच्या केंद्रीय पक्ष कार्यालयातून दोन्ही नावांची घोषणा झाली असून चिंचवड मतदारसंघासाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना तिकीट देण्यात आले आहे. तर, कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत नारायण रासने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे, आता येथील मतदारसंघात निवडणुकांचा धुरळा उडणार हे निश्चित झालं आहे.

आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी कसबा विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पोटनिवडणूक येत्या २६ फेब्रुवारीला रोजी पार पडणार आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, संभाजी ब्रिगेड सर्वानीच जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.

त्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजप प्रयत्नशील असून कसबा निवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती करत आहे. परंतु विरोधी पक्षांनी निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. त्यातच भाजपनेही बैठक घेण्यास सुरुवात केली uहोती. पुण्यात आज भाजप- शिंदे गट आणि इतर संघटनांसोबत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेतली आणि या पोटनिवडणुकांसाठी उमेदवार जाहीर होणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार, भाजपच्या केंद्रीय् कार्यालयातून पुण्यातील या दोन्ही जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे.

error: Content is protected !!