ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊतवाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाण

*राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी सोडणार नाही- श्री.बजरंग सोनवणे.*

केज!प्रतिनिधी!

बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे हे पक्षावर नाराज असून पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगू लागल्या होत्या.बजरंग सोनवणे हे शिंदे गटात प्रवेश करत असल्याच्या चर्चा वाऱ्या सारख्या पसरत असल्याने बजरंग सोनवणे यांच्याशी आमच्या केज तालुका प्रतिनिधींनी संपर्क साधून बातचीत केली असता,सोनवणे यांनी सांगितले की मी अजिबात पक्ष सोडणार नाही असल्या अफवावर कार्यकर्त्यांनी विश्वास
ठेवू नये.ते पुढे म्हणाले,मी शरदचंद्र पवार, अजित दादा पवार,आ.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शना खालीच काम करणार असल्याचे काही महिन्यापूर्वी बीड येथे पत्रकार परिषदे स्पष्ट केले आहे.तसेच मी गेली अनेक वर्ष राजकारण व समाजकारणाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात प्रामुख्याने काम करीत आहे. मी राष्ट्रवादी पक्ष सोडणार नाही, अशी भूमिकाही बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!