ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

वारीशेच्या खुन्याला जन्मठेप झालीच पाहिजे रत्नागिरीत निघाला मोर्चा

 

रत्नागिरी | पत्रकार शशिकांत वारिशे याच्या खुन्याला फाशी किंवा जन्मठेप झालीच पाहिजे.. वारिशेच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे …रिफायनरी हटवा ..कोकण वाचवा अशा घोषणांनी राजापूर दणाणून गेले. वारिशेंच्या अपघातानंतर संतप्त झालेल्या रिफायनरी विरोधी जनतेने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.

राजापूर शहरातील गणेश विसर्जन घाटापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चामध्ये खासदार विनायक राऊत, कोकण रिफायनरी विरोधी समितीचे अध्यक्ष अशोक वालम, रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चात रिफायनरी विरोधी घोषणा देण्यात आल्या. कोकणची भूमी वाचविण्यासाठी रिफायनरी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे यासह दिवंगत पत्रकार शशिकांत वारिशे याच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे, शासनाने या प्रकरणाचा कसून तपास करावा अशीही मागणी केली.

error: Content is protected !!