ब्रेकिंग न्युज
लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळे

महिलेचे अश्लील भाषेत प्रसिद्धी पत्रक छापल्याने, अंजनगाव सुर्जी पोलिस स्टेशनला महिलेची तक्रार

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी:

काही मानसिक विकृत प्रवृत्ति बदला घेण्याच्या उद्देशाने कोणती युक्ती काढतील हे सांगणे कठीण आहे. अशीच एक घटना आज अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन हद्दीतील तुरखेड या गावात उघडकीस आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, तुरखेड येथील एक विधवा महिला आपल्या १४ वर्षाचा मुलगा व सासूसह तुरखेड या गावात राहते, तिचे पती काही दिवसांपूर्वी मृत्यू पावले आहेत. ती मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करते तर तिच्या गावा जवळ कारला हे गाव येत असून, येथील युवक आरोपी प्रकाश ज्ञानदेव अढाऊ वय वर्ष 35 याच्या सोबत तीन वर्षांपूर्वी तो गाडी चालक असल्याने त्या महिलेची ओळखी झाली होती. तसेच ती महिला बचत गटाचे काम करण्याच्या निमित्ताने सदर व्यक्तीची गाडी भाड्याने घेत होती. तेव्हापासून ते दोघे एकमेकांना ओळखत होते. परंतु प्रकाश ज्ञानदेव अडाऊ याने महिलेच्या ओळखीचा फायदा घेत तिला त्रास देणे सुरू केले असे त्या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

गुन्हातील आरोपीने महिलेच्या घरी जाऊन दिनांक 19/ 4/ 2023 रोजी रात्री 10:30 वाजता अश्लील भाषेत शिवीगाळ केली गावातीलच नागरिकांच्या समोर त्या महिलेला म्हणाला की तुझे पोस्टर छापून मी तुझी बदनामी करतो.

तेव्हा त्याने दिनांक 20/ 4/ 2023 रोजी सकाळी त्या महिलेच्या दरवाजा समोरील भिंतीवर झेरॉक्स मशीन वरून छापलेले अश्लील भाषेतील पोस्टर चिपकून त्याच्यावर नावा सहीत अश्लील मजकूर लिहिला. तसेच रात्री हजार रुपये सकाळी सातशे पन्नास रुपये अशा स्वरूपाचे पोस्टर त्यानी सर्वीकडे वाटप केले व भिंतीवर चिपकविले व महिलेचा मोबाईल नंबर सुद्धा त्यात छापला हे सर्व महिलेचा मुलगा सार्थक भालेराव वय वर्ष 14 याला ते आढळून आले.

तेव्हा त्याने हा सर्व प्रकार त्याच्या आईला सांगितला त्यामुळे महिलेने तात्काळ अंजनगाव सुर्जी येथील पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारी वरून अंजनगाव सुर्जी पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 294, 448, 500, 501, 506, 509 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली, बीट अंमलदार इंगळे करीत असून, झेरॉक्स मशीन संचालकावर व बदनामी करणा-या व्यक्ती वर उचित कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पिढीत महिलेने केली आहे.

error: Content is protected !!