ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

योजना जनकल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी ‘ शुक्रवारी मंद्रुपमध्ये आयोजन – तहसीलदार लिंबारे

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी- संजय कुंभार

महाराष्ट्र शासन नियोजन विभागाच्या कल्याणकारी राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुला मुलींची शाळा येथे शुक्रवारी २६ मे रोजी सकाळी १० वाजता ‘ शासन आपल्या दारी अंतर्गत योजना कल्याणकारी ‘ सर्वसामान्यांच्या दारी या अभियानाचे शिबिर राबविण्याचे प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे व निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार साहेब जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनानुसार अभियानाचे शिबिर आयोजित केले असल्याची माहीती तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी दिली .
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली , आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे , सहायक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे व निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत . या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयात जावे लागते . अनेक वेळा लोकांना शासनाकडून देय असलेल्या योजनांची माहिती न मिळाल्याने योजनांचा फायदा गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही . त्यामुळे या योजनेचा उद्देश सफल होत नाही . म्हणून या अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय योजनेशी निगडित कार्यालयाचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचा लाभ शिबिर ठिकाणी देण्यात येणार आहे . तरी अप्पर तहसील मंद्रूप कार्यालयाअंतर्गत ४३ गावे व चार मंडळातील नागरिकांनी शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेण्याचे व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी केला आहे . यावेळी गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ , तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी , महसूल नायब तहसीलदार जितेंद्र मोरे , नायब तहसीलदार शुभांगी जाधव , दत्तात्रेय गायकवाड , आरती दबडे , विठ्ठल जाधव यासह विविध खात्याचे प्रमुख उपस्थित होते .

error: Content is protected !!