ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

केंद्राच्या एका निर्णयामुळं 1 जूनपासून देशात इलेक्ट्रीक(दुचाकीं ) वाहनांच्या किमतीत वाढ!

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

केंद्राच्या एका निर्णयामुळं 1 जूनपासून देशात इलेक्ट्रीक(दुचाकीं ) वाहनांच्या किमतीत वाढ!

 

दिल्ली (प्रतिनिधी):- देशात सध्या साधारण दर तिसऱ्या व्यक्तीकडे दुचाकी आहे. प्रवास सुखकर होण्यासाठी, अपेक्षित ठिकाणी वाहतूक कोंडीतून तुलनेनं वेळेत पोहोचण्यासाठी या दुचाकींचा मोठ्या प्रमाणत वापर केला जातो. पण, आता हीच दुचाकी खरेदी करण्याचा विचार तुम्ही केला असेल, तर यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. कारण ठरतोय तो म्हणजे केंद्र शासनानं घेतलेला एक निर्णय.

कोणता नियम बदलला?
केंद्र शासनानं इलेक्ट्रीक वाहनांवर दिल्या जाणाऱ्या अनुदानात घट केली असून, आता ते 15000 रुपयांऐवजी 10 हजार रुपये इतकं करण्यात आलं आहे. प्रती किलोवॅटमागे हे दर बदलले असून, आता त्याचा परिणाम दुचाकींच्या किमतीवर होणार आहे. किंबहुना या दुचाकींची किंमत तब्बल 25 ते 35 हजारांनी वाढणार आहे.

इलेक्ट्रिक वाहनांवर देण्यात येणाऱ्या अनुदानात कपात केल्यामुळं या दुचाकी तयार करणाऱ्या कंपन्या दुचाकींचे फिचर्स आणि त्यांच्या बॅटरी पॅकमध्ये कपात करण्याचा निर्णय घेऊ शकतात. फेम स्कीम II अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांवर मिळणाऱ्या अनुदानात कपात झाल्यामुळे एथर 450 एक्सच्या दरांत तब्बल 32500 रुपयांनी वाढ झाली आहे.

ओलाही महागली…
फक्त एथरत नव्हे, तर आघाडीच्या इलेक्ट्रीक वाहन निर्मात्या OLA या कंपनीकडूनही स्कूटरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळं इथून पुढे या दुचाकीची किंमत लाखोंच्या घरात असेल. सध्या ओलाच्या दुचाकींमध्ये 15 हजारांनी वाढ झाल्यामुळं ओला एस1 ची नवी किंमत 1,29,999 रुपये, ओला एस1 एयर ची किंमत 99,999 रुपये आणि ओला एस1 प्रो ची किंमत 1,39,000 रुपये (एक्स शोरुम) इतकी असेल.

इलेक्ट्रीक दुचाकीच्या क्षेत्रात गुजरातच्या स्टार्टअप असणाऱ्या मॅटर एनर्जी या कंपनीनंही त्यांच्या एरा या दुचाकीच्या दरात 30 हजार रुपयांनी वाढ केली आहे. ज्यामुळं आता या दुचाकीचे दर 1.74 आणि 1.84 लाखांच्या घरात पोहोचले आहेत.

दरम्यान, एप्रिल 2023 मध्ये इलेक्ट्रिक दुचाकींची सर्वाधिक विक्री झाल्याची माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन (फाडा) कडून देण्यात आली होती. एकिकडे EV ला पसंती मिळत असतानाच दुसरीकडे त्यावरील अनुदानात कपात करण्यात आल्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचावत आहेत.

error: Content is protected !!