ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

माजी आमदार शिवशरण (आण्णा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 113 रक्तदात्याचे रक्तदान

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभुते

मा.आमदार शिवशरण (अण्णा) बिराजदार-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवराज प्रतिष्ठान व अण्णा मित्र परिवारा तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . रक्तदान शिबिरामध्ये 113 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पुष्कराज काडादी (चेअरमन सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सोलापूर), प्रशांत जोशी सर (संपादक संचार वृत्तपत्र), डॉ. मल्लिकार्जुन तरनल्ली (चेअरमन केअर हॉस्पिटल), डॉ. सुनील मोरे (मनोरमा हॉस्पिटल), डॉ. राहुल कुलकर्णी , हनुमंत जाधव (मा. प्रशासन अधिकारी), अशोक भांजे (मा. शिक्षण विस्तार अधिकारी), अशोक अण्णा बिराजदार-पाटील,औटी , राजू हौशेट्टी (समाजसेवक), रेवण बुक्कानुरे (समाजसेवक) त्याचबरोबर शिवराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. राजशेखर बिराजदार-पाटील व सर्व अण्णा स्नेही उपस्थित होते.
सदर कार्यक्रमांमध्ये पुष्कराज काडादी यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून देत अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,त्याचबरोबर डॉ.मल्लिकार्जुन तरनल्ली , डॉ. सुमित मोरे यांनी आपल्या भाषणात कोविडच्या पार्श्वभूमीनंतर झालेल्या रक्ताचा तुटवडा व भविष्यात रक्ताची लागणारी गरज याबाबत संबोधन केले. प्रशांत जोशी यांनी 35 वर्षापासून अविरत होत असलेल्या रक्तदान शिबिराचे कौतुक करत अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .
शिवराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. राजशेखर बिराजदार-पाटील यांनी सालाबादप्रमाणे होत असलेले रक्तदान शिबिर व समाजात अण्णांनी केलेले कार्य या आठवणींना उजाळा दिला.अशोक भांजे, हनुमंत जाधव , रेवण बुक्कानुरे यांनी उपस्थितांनी संबोधन करत अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप बगले सरांनी केले व आभार प्रदर्शन मदन पोलके सरांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश नाईक प्राथमिक शाळा व कै. मातोश्री मलकव्वा हणमंतप्पा बिराजदार-पाटील प्रशालेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!