ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

आपचा आमदार महिलेला हॉटेल रूममध्ये घेऊन गेला मागून महिलेचा पती आल्यावर….

 

आप पक्षाच्या एका आमदाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा आमदार एका महिलेसोबत दिसत आहे. महिलेनं आपला चेहरा कपड्याने झाकलेला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिलेचा पती आल्यावर सदर आमदार तोंड लपवून पळाल्याचे दिसत आहे. आप आमदाराच्या महिलेसोबतच्या व्हिडीओमुळे गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या व्हिडीओवरून उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सूरतमधील एका हॉटेलमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. आम आदमी पक्षाचे आमदार एका महिलेसोबत हॉटेलच्या गेस्ट हाऊसमध्ये आले. तिथे त्यांनी रिसेप्शनवर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर ते त्या महिलेला घेऊन खोलीत आले. मात्र या महिलेचा पती मागून आल्याने या आमदारांनी तोंडावर रुमाल धरून स्वत:ची ओळख लपवली. या व्हिडीओमध्ये दिसत असलेले व्यक्ती हे आपचे आमदार भूपत भयाणी असल्याचा दावा केला जात आहे. मात्र या व्हिडीओवर आपने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालेला हा व्हिडीओ हा ८ जूनचा आहे. हा व्हिडीओ आणि महिलेसोबत हॉटेलमध्ये जाणे आणि तिथून बाहेर येण्याच्या दाव्यावर आपच्या आमदारांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. . भूपत भयाणी हे विसावदर मतदारसंघातील आमदार आहेत. पाटिदार समुदायाशी संबंधित भयाणी हे त्यांच्या विभागात लोकप्रिय आहेत

error: Content is protected !!