ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

देशात लोकशाही वाचविण्यासाठी शरद पवारांना साथ द्या

 

आज दिल्लीत महिला कुस्तीपटूंनी आपला हक्क मागितला तर त्यांना अगदी रस्त्यावरून फरफटत नेले जाते, तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी केलेले काम सांगण्यासाठी आज टिफिन बैठका घेतल्या जात आहेत. भविष्यात देशाची लोकशाही वाचवायची असेल तर शरद पवारांशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

चिंचोशी (ता. खेड) येथे शासनाच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व गावातील नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

पुढे बोलताना खासदार कोल्हे म्हणाले की, ‘शरद पवारसाहेबांनी राज्यात ठिकठिकाणी औद्योगिक वसाहती स्थापन केल्या. साखर कारखाने उभारले. दूध व्यवसायाला चालना दिली. ज्यामुळे राज्याचा विकास होण्यासाठी अधिक चालना मिळाली. याउलट आजच्या काळात लोकांना कृषिमंत्र्यांचेही नाव सांगता येत नाही. ‘जो बोलगा, उनका कान कटेगा’ अशी भयावह परिस्थिती आहे

error: Content is protected !!