ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरची बाजारात 3 कोटी रुपयांचा खरेदी विक्रीवरचा सेस गहाळ

⚡चौकशी अहवालात कृषी उत्पन्न बाजार समीती प्रशासनावर ठपका

⚡जिल्हा उपनिबंधकांकडून कारवाईला सुरुवात

महेन्द्र भगत अंजनगांव सुर्जी तालुका प्रतिनिधी:

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे बाजार समीतीच्या आवारात मिरची बाजार हा समितीमार्फत चालवीला जातो. मिरची बाजारातील घोळाबाबत चर्चा सुरू असतांना व केलेल्या तक्रारीवर चौकशी समीती नेमण्यात आली होती. सदर चौकशी समीतीने मिरची व्यवहारातील रेकार्ड तपासले असता, अनेक घोळ झाल्याचे शिक्का मोर्तब केले असुन, बाजार समीतीला लाखो रुपयांच्या सेसला चुना लावल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे, बाजार समीतीचे झालेल्या नुकसान भरपाई चा मिरचीचा ठसका कोणा-कोणाला बसनार हे मात्र जिल्हा उपनिबंधकाच्या कारवाई नंतरच पुढे येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समीतीत मिरची बाजारात अनेक संदीग्ध बाबी घडामोडी घडत असतांना, बाजार समीतीचे सचिव गजानन नवघरे व सुपरवायझर अमर साबळे यांनी बाजारात घडणाऱ्या बेकायदेशीर कार्याकडे लक्ष न देता, बेकायदा मंडळींना थातुरमातुर पत्र देउन पाठराखन केली होती. ही पाठराखनच त्यांचेवर उलटली असल्याचे चौकशी अहवालात सामोरे आले आहे. चौकशी समीतीने बाजार समीतीवर गंभीर ठपके ठेवतांना समीतीच्या रेकॉर्डनुसार समितीकडे लायसन्स धारक मिरची व्यापारी नसने, बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडुन माल येणे अपेक्षीत असतांना लायसन्स धारक व्यापाऱ्यांनी खरेदी करून सौदा चीठ्ठी देणे , हिशेब पट्टी शेतकऱ्यांस देणे आवश्यक असतांना असा कोणताही व्यवहार न करने, मिरची मालाची बाजार समितीच्या गेटवर आवक रजिस्टरला थातुर-मातुर पध्दतीने नोंद घेणे, मिरची विक्री करतांना दिल्या जाणारी बिले बाजार समितीकडुन अप्रमाणीत बिलाचा वापर, वेगवेगळ्या खरेदीदारास एकाच नंबरचा बिलाचा वापर, ईत्यादी गंभीर ठपके चौकशी अहवालात नमुद आहेत.

महत्वाचे म्हणजे बाजार समीतीने प्रकरणाची वेळीच दखल घेतलेली नसल्याने समितीने याबाबत तेव्हाच अडते यांचे रेकॉर्ड तपासुन बाजार समितीत सादर केलेल्या बिलांचा सेस वसुल केलेला नसल्याने मीरची विक्रीवरील सेसचे उत्पन्नाच्या महसुला मार्फत बाजार समीतीचे लाखो रुपयाचे नुकसान झालेले असुन, सदर सेस कोणा कडुन वसुलपात्र आहे हे जिल्हा उपनिबंधकांचे कारवाई नंतर कळणार असुन, सदर चौकशी अहवालावर जिल्हा उपनिबंधक काय आदेशीत करतात या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे .

सदरचे प्रकरणात एकाच नंबरच्या बिलाचा दोन वेळा वापर झाला असे अनेक बिले असतांना बिलाची पडताडनी करताना बाजारसमीती सुपरवायझर यांना हे निदर्शनास आणून दिल्यानंतर सुद्धा व याची नोंद घ्या असे विनंती केल्यावर सुद्धा त्यांनी लक्ष तर दिले नाहीच, परंतु वरीष्ठाचे आदेश नाही म्हणुन नकार देत, व्यापाऱ्यांना बिले बुके घेऊन पळण्यास मज्जाव न करता पळुन जाउ दिले होते हे विशेष. ह्या गंभीर बाबीला बाजारसमीतीचे सचीव गजानन नवघरे याने लिखीत दुजोरा देऊन सुपरवायझर यास पाठबळ दिले होते, जर त्यावेळेसच सदर बिलबुके ताब्यात घेण्यात आली असती तर सर्व व्यापाऱ्यांची डझनभर बिल बुके एकाच वेळी, एकाच दिवशी, एकाच अर्जावर हरविली नसती या सर्व अनागोंदी कारभारास प्रशासकीय सचिव कारणीभूत आहेत हे सिद्ध झाले आहे.

◼️सदरचे बाबीबाबत तालुका सहाय्यक निबंधक राजेश यादव यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की सदर बाबीबाबत चौकशी झालेली आहे, त्याचा अहवाल आम्ही जिल्हा उपनिबंधक यांना पाठवला असून, त्याबाबत जिल्हा उपनिबंधक बाजार समितीला कोणत्या कार्यवाहीचे निर्देश देतात हे आदेश आल्यावरच कळणार असे सांगितले.
– सहाय्यक निबंधक राजेश यादव

◼️मिरची बाजारातील सेस मध्ये कुठलाही घोळ झालेला नाही एकुण 17 हजार रुपये सेस पैकी 15 हजार 418 रूपये धनादेश द्वारे तर उर्वरीत रक्कम रोख वसुल केली.
-गजानन नवघरे, सचिव बाजार समिती

◼️ऑडिटर ने जे लेखा परीक्षण मध्ये पैसे काढले ते सर्व पैसे भरले असुन तसा अहवाल सुद्धा देण्यात आला.
– अमर साबळे, पर्यवेक्षक कृषि उत्पन्न बाजार समिती

error: Content is protected !!