ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

मानवहित लोकशाही पक्ष सोशल मीडिया अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सचिन इंगळे यांची निवड

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी:

लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे नातू तसेच मानवहित लोकशाही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सचिन साठे यांच्या अध्यक्षतेखाली तथा मार्गदर्शनात, महाराष्ट्र प्रदेश सचिव आकाश घोलप यांच्या नेतृत्वात, सचिन इंगळे यांची मानवहित लोकशाही पक्ष सोशल मीडिया अमरावती जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थितित तळागाळापर्यंत समाजकार्यात अग्रेसर राहुन मानवतावादी विचार पोहोचवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणा-यांपैकी सचिन इंगळे हे एक आहेत. मानवहित लोकशाही पक्षाचे काम व विचारसरणी हे जिल्ह्यातील घरा-घरात प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचवीण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन सचिन इंगळे यांनी बोलताना केले. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरावरुन अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांनी आपल्या निवडीबद्दल व संधि दिल्याबद्दल मानवहित लोकशाही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सचिन साठे आणी महाराष्ट्र प्रदेश सचिव आकाश घोलप यांचे आभार मानले.

error: Content is protected !!