ब्रेकिंग न्युज
घाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताहपारगाव सिरस येथे बैलगाडी शर्यतीमध्ये आली रंगत ..!वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊतवाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान 

शिवाजीराव जाधव( सहशिक्षक) यांचा सेवापुर्ती सोहळा उत्साहात संपन्न.

शिवाजीराव जाधव (सहशिक्षक) यांचा सेवापुर्ती सोहळा उत्साहात संपन्न.

केज!प्रतिनिधि

सुमठाणा जी.लातूर येथील मूळ रहिवाशी असलेले शिवाजी बजरंग जाधव अतिशय मनमिळावू, विद्यार्थी व पालक प्रिय, यांनी लातूर जिल्ह्यात दर्जी बोरगाव, मांजरी, हाडगाव इत्यादी ठिकाणी सेवा करत जि.प.शाळा साखरा येथे ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवा करून नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या या सेवापूर्तीचा भव्य दिव्य कार्यक्रम दि.९-१०-२०२३ रोजी साळाई मंगल कार्यालय पडिले लॉन्स लातूर येथे पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.व्ही.बी. शेळके(मा. कुलगुरू कृषी वि. परभणी) हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचमगल्ले साहेब (ग.शी.आ. लातूर), रामराव तुपकर (मा. तहसीलदार नांदेड), कमलताई लोमटे (मा. लेखाधिकारी पं.स. लातूर), वसंतराव कातळे (मा. लेखाधिकारी जी.प.लातूर), बाबुराव दळवे (ना‌. तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय बीड),डी.सी. गायकवाड (शिक्षण विस्तारक अधिकारी), सोमनाथ भोयने(केंद्रप्रमुख गातेगाव), दगडू साहेब सोळंके महाळंगी, नवनाथ साखरे कव्हा हे होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली. यावेळेस मान्यवरांचा सत्कार शिवाजी जाधव, शिवानंद चिट्टे, राजाभाऊ जाधव, कृष्णा साळुंके, मंजुषा जाधव, विश्वजीत जाधव, गणेश शेळके, दत्तात्रय देशमुख, महादेव दळवे यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती शिवाजी जाधव पत्नी मंजुषा जाधव यांचा भव्य दिव्य सत्कार विश्वजीत जाधव व मित्रपरिवार कडून करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात वसंतराव कातळे, कमलताई लोमटे, देशी गायकवाड, सोमनाथ बोयसे, भुसणीकर सर, यांनी मनोगत व्यक्त केले. सत्कारास उत्तर देताना शिवाजी जाधव यांनी सेवा काळातील जुन्या आठवणीला उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोंढे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन गोविंद सूर्यवंशी यांनी केले शिवाजी जाधव यांचा सत्कार करण्यासाठी आपीष्टांची लाईन लागली होती, कार्यक्रमास नातेवाईक, क्षेत्रातील अधिकारी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुची भोजनाने कार्यक्रमाची सांगता आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वजीत जाधव व मित्रमंडळीने परिश्रम घेतले.

सोबत फोटो

error: Content is protected !!