ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बनावट सिम खरेदी केल्यास थेट ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाखांचा दंड ठोठवण्याची तरतूद

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै. महाराष्ट्र सूर्योदय

बनावट सिम खरेदी केल्यास थेट ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाखांचा दंड ठोठवण्याची तरतूद

दिल्ली :-कोणीही बनावट सिम खरेदी केल्यास ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाखांचा दंड भरावा लागणार आहे. केंद्र सरकारने संसदेतील राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांतून एक कायदा पारित केलाय. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर हे विधेयक कायदा बनणार आहे. यामुळे जर तुम्ही बनावट कागदपत्रांवर सिम खरेदी केले तर तुम्हाला मोठा भुर्दंड भरावा लागू शकतो.

या विधेयकातील तरतुदीनुसार आता सिम कार्ड देण्यापूर्वी टेलिकॉम कंपन्यांना संबंधित ग्राहकांची बायोमेट्रिक ओळख पटवावी लागेल. जर तसं केलं नाही तर राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देऊन दूरसंचार सेवा किंवा नेटवर्क ताब्यात घेण्यास किंवा संबंधित कंपनीची सेवा निलंबित करण्याचा अधिकार सरकार घेईल. युद्धसदृश परिस्थितीत आवश्यकता असल्यास सरकार दूरसंचार नेटवर्कवरील संदेश थांबवू शकते.

दरम्यान तुम्ही वापरत असलेले सिम बनावट आहे की नाही हे हे शोधणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला संचार साथी पोर्टलला भेट द्यावी लागेल. हे पोर्टल दळणवळण विभागाच्या अंतर्गत काम करते.

बनावट सिम असे करा ब्लॉक

तुम्हाला https://sancharsaathi.gov.in/ पोर्टलवर भेट द्यावी लागेल.

साइट ओपन झाल्यानंतर तुम्हाला Know Your Mobile Connections या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला 10 अंकी मोबाईल नंबर टाकावा लागेल.

यानंतर कॅप्चा कोड आणि OTP टाकावा लागेल.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या नावावर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाचा तपशील मिळेल.

कोणताही नंबर संशयास्पद वाटल्यास तो ब्लॉक करावा.

बायोमेट्रिक पडताळणी महत्त्वाची

नवीन कायद्यानुसार मोबाइल सिम घेणे कठीण होणार आहे. नवीन कायद्यानुसार जिओ आणि एअरटेल सारख्या सर्व टेलिकॉम कंपन्या बायोमेट्रिक पडताळणीनंतरच मोबाइल सिम कार्ड जारी करतील. टेलिकॉम कंपन्यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना २ कोटी रुपयांचा दंड भरावा लागेल. मोबाईल सिमकार्ड विकणाऱ्या दुकानाचा परवाना देखील रद्द करण्यात येईल.

error: Content is protected !!