ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

उत्तर सोलापूर तालुका शिवसेनेच्या वतीने विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात तालुकाप्रमुख संजय पौळ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध आंदोलन..

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी- संतोष विभुते

उत्तर सोलापूर तालुका शिवसेनेच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष्याच्या संदर्भात दिलेल्या निर्णयाविरोधात शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेशदादा वानकर यांच्या आदेशानुसार, शिवसेना तालुका प्रमुख संजय पौळ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध आंदोलन शुक्रवार 12/01/2024 रोजी उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची गावात करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुका समन्वयक वजीर शेख, शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे तालुका संघटक नशीरराजे शेख, महीला आघाडी संघटक पारिणीता शिंदे, युवासेना तालुका संघटक अजिंक्यराणा देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी, तीव्र शब्दांत निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय आम्हाला कदापि मान्य नाही. तसेच हा निर्णय एकतर्फी आणि दिल्लीवरून आलेल्या पत्रावरून घेण्यात आला आहे. अशा शब्दात तीव्र निषेध व्यक्त करीत ; छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा करून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिवसैनिकांसोबत सामान्य जनतेने सुद्धा या निषेध आंदोलनात सहभाग घेतला असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले..

यावेळी, शिवसेना तालुका प्रमुख संजय पौळ यांनी सांगीतले की, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या हितरक्षणासाठी जगातील सर्वोत्तम घटना लिहिली. आणि तीच घटना जगाला मार्गदर्शक आहे. परंतु त्या घटनेची पायमल्ली करून लोकशाही धोक्यात येईल. असा शिवसेना पक्षाबाबत पूर्णपणे अन्यायकारक निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिला असून अशा प्रकारचे निर्णय जर घेण्यात येत असतील तर सामान्य जनता व शिवसैनिक कदापि सहन करणार नाहीत व या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल अशा भावना व्यक्त केल्या.
या आंदोलनात शिवसेना तालुका प्रमुख संजय पौळ, शिवसेना उप तालुका प्रमुख सचीन घोडके, उपतालुका प्रमुख अच्चूतराव बाभळे, माजी सभापती धनंजय लामकाने, उपतालुका प्रमुख सदाशीव सलगर, शिवसेना विभागप्रमुख हरीदास कुंभार, उपविभाग प्रमुख अरुण लोंढे, युवा सेनेचे गणेश गणेश गोफणे, राजाराम कोलते, राजू घाटे, दादासाहेब काशीद, उपविभाग प्रमुख नागनाथ गुत्ती, शाखाप्रमुख विष्णू भोसले, अजीनाथ कांबळे, भोगाव चे बाळासाहेब चव्हाण, शिवदूत प्रशांत चव्हाण, दिलीप सुरवसे,नानासाहेब कर्दळकर, नितीन हेगडे , गुळवंची चे माजी सरपंच दिनेश जगताप, प्रशांत पौळ , अभिमन्यू यादव, विजयसिंह शिंदे, आबासाहेब शिंदे, आबासाहेब अर्जुन, संभाजी भोसले, मधुकर आयवळे, संजय गवळी,दत्ता कोरके, सुभाष काटे,पांडुरंग जाधव यांच्यासह असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

error: Content is protected !!