ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

मनसे चुनाभट्टी शाखेच्या माध्यमातून मराठी तरुण-तरुणांनीसाठी रेल्वे आणि पोलीस भरती मार्गदर्शन शिबिराचे अयोजन

 

मुंबई प्रतिनिधी : राज्यात नाही तर देशात सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा आकडा वाढत आहे. मात्र आता सर्व तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी समोर येत असून बेरोजगारांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध भरतीच्या प्रक्रिया राबवल्या जाणार आहे. त्यातच रेल्वे आणि पोलीस भरती प्रक्रिया येणाऱ्या दोन ते तीन महिन्यात पार पडणार आहे. या पूर्वी पार पडलेल्या भरती प्रक्रियेत सरकारी नोकरीत मराठी टक्का वाढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून वेळोवेळी पर्यटन केले गेले तसेच अनेक मार्गदर्शन शिबीर राबवण्यात आलीत अशातच आता येणाऱ्या रेल्वे आणि पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

चुनाभट्टी १७१ चे शाखा अध्यक्ष श्री.श्रीकांत सूर्यकांत निकम आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांनी येत्या रविवारी ७७ /७८ आरु बंगला टेरेस, जुन्या म्हाडा कॉलनी समोर, स्वदेशी मिल रोड. चुनाभट्टी पोलीस स्टेशन जवळ, चुनाभट्टी : ४०००२२ येथे नामवंत करिअर मार्गदर्शक ओमकार करीयर अकॅडमीचे प्रमुख मा. ओमकार पावर सर यांचे मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे. तरी चुनाभट्टी मधील सर्व तरुण-तरुणींनी मार्गदर्शन शिबिराला हजेरी लावून रेल्वे आणि पोलीस भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती आणि पेपर पॅटर्न जाणून घेण्याचे आवाहन श्री.श्रीकांत सूर्यकांत निकम यांनी केले आहे.

 

कोविड च्या काळात संपूर्ण भरती प्रक्रिया ठप्प असल्यामुळे मागील दोन वर्षात कोणत्याही प्रकारची सरकारी भरती झालेली नाहीये. त्यामुळे या भरतीला मोठ्या प्रमाणामध्ये तरुण आणि तरुणी अर्ज करणार आहेत मात्र रेल्वे आणि पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक तसेच कोणत्या विषयाचे असणार तसेच किती मार्कचे पेपर असणार याबाबत आजच्या तरुणांना कल्पना नसल्यामुळे अभ्यासाची तयारी करून सुद्धा अनेकदा त्यांना अपयशाला सामोरे जावे लागते. त्यामुळे या मार्गदर्शनातून पेपरमध्ये येणारे विषयी तसेच ते कसे सोडवायचे आणि मेरिटमध्ये यायचे या बद्दल त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त तरुणांनी यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन श्री.श्रीकांत सूर्यकांत निकम यांनी चुनाभट्टीतील तरुण तरुणांना केले आहे.

error: Content is protected !!