ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

शिबीरामुळे ग्रामीण भागातील रूग्णांना याचा फायदा – प्राध्यापक मधुकर राळेभात

शिबीरामुळे ग्रामीण भागातील रूग्णांना याचा फायदा – प्राध्यापक मधुकर राळेभात

आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून रुग्णांना मोठ्या प्रमाणात शिबीराचा लाभ

जामखेड प्रतिनिधी;-डाॅ. आरोळे हाॅस्पिटल येथे फुफ्फुसे, हृदय, हाडे, सांधे, किडनी, कान, नाक, घसा आजारांची मोफत तपासणी शिबिर संपन्न

जामखेड येथिल रहिवासी असलेले मात्र जागतिक किर्तीचे रॅमन मॅगसेस पुरस्कार प्राप्त डॉ. रजनीकांत आरोळे यांनी ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची आरोग्य सेवा करता यावी म्हणून ४०-५० वर्षांपूर्वी हा भाग निवडला. त्यांनी केलेल्या सेवेमुळे ते एक देव ठरले. तीच सेवा पुढे डॉ. शोभा आरोळे व रवि आरोळे हे करत आहेत. आज आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुण्याहून डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयातील हॉस्पिटलचा स्टाफ या ठिकाणी आलेला होता. आणि त्यांनी या शिबिरात वेगवेगळ्या आजारांचे निदान व त्यावर उपचार केले. तालुक्यातील व परिसरातील रुग्ण मोठ्या प्रमाणात या शिबीराचा लाभ घेत आहेत. या माध्यमातून जामखेड तालुका आरोग्य संपन्न होण्यास नक्कीच मदत होईल. या कामगिरीबद्दल मी आयोजकांचे डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल व डॉ. आरोळे हॉस्पिटलचे आयोजकांच्या वतीने आभार मानतो. असेही वक्तव्य ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात यांनी यावेळी केले.

यावेळी बोलताना डॉ. शोभाताई आरोळे म्हणाल्या की, कर्जत-जामखेड एकात्मिक बालविकास प्रकल्प , डॉ. डि.वाय.पाटील आर्युर्वेदिक रुग्णालय पुणे, डॉ.आरोळे हाॅस्पिटल व जामखेड येथिल आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या शिबीरामुळे ग्रामीण भागातील रूग्णांना याचा फायदा होत असल्याचा मोठा आनंद वाटत आहे. या शिबीरासाठी खुप लांबून व मोठय़ा संख्येने लोक आले होते. यासाठी आ. रोहीत पवार, डि.वाय.पाटील रुग्णालयाची टीम व स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मी व आमचे बंधू रवि आरोळे आम्ही आभार मानतो. असे वक्तव्य डॉ. आरोळे हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. शोभाताई आरोळे यांनी केले आहे.
या शिबीराचा ४३४ रुग्णांनी लाभ घेतला.

आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था, डॉ. डि.वाय.पाटील आर्युर्वेदिक रुग्णालय पुणे, डॉ.आरोळे हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दि.११ व दि.१२ फेब्रुवारी पर्यंत शहरांसह तालुक्यातील रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात फुफ्फुसे, हृदय, हाडे, सांधे, किडनी, कान, नाक, घसा इत्यादीं आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. आरोळे हाॅस्पिटलच्या संचलिका डॉ.शोभाताई आरोळे, जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, नगरसेवक अमित जाधव, आसिफ पठाण, आ. रोहित पवार यांचे आरोग्य विभागचे स्विय सहाय्यक मारुती बारस्कर तसेच डॉक्टर, सिस्टर, ब्रदर्स आदिंसह रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!