ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

अंजनवती येथे श्री.संत तुकाविप्र महाराज मठामध्ये विवेक महाराज यांचे कीर्तन

अंजनवती येथे श्री.संत तुकाविप्र महाराज मठामध्ये विवेक महाराज यांचे कीर्तन
बीड । प्रतिनिधी;-अंजनवती ता.जि.बीड येथील श्री संत तुकाविप्र महाराजांच्या 232 व्या पुण्यतिथी महोत्सवात मठाधिपती ह.भ.प. विवेक भानुदासबुवा विप्र महाराज यांचे कीर्तन झाले यावेळी ह.भ.प. कुमार महाराज विप्र, ह.भ.प. माणिक महाराज विप्र, ह.भ.प.संत आनंदराव महाराज येडे, ह.भ.प. अर्जुन महाराज पाटील, ह.भ.प. शशी महाराज विप्र, ह.भ.प. अनंतकाका मुळे महाराज, भास्करबुवा विप्र,ह.भ.प.रवि महाराज विप्र,ह.भ.प.सतीष महाराज लांडगे,ह.भ.प. ज्ञानोबा माऊली पालसिंगणकर,ह.भ.प.मीठु महाराज कोरडे, ह.भ.प.तुकारामबुवा सगळे, रामायणाचार्य जालिंदर महाराज येडे ,ह.भ.प.सुनील महाराज विप्र,ह.भ.प.प्रवीण महाराज विप्र,सरपंच  कवीता कैलास येडे पाटील, विकास पाटील अंजनवतीकर तथा मुन्नाकाका,सुनील येडे पाटील यांची उपस्थिती होती.
यावेळी ह.भ.प. विवेक महाराज यांनी आपल्या कीर्तनामध्ये सांगितले की,  श्री क्षेत्र अंजनवती येथे अध्यात्माबरोबरच व्यवसाय निर्मितीचे केंद्र निर्माण झाले पाहिजे जेणेकरून हजारो नवतरुणांना रोजगारांची संधी निर्माण होईल यासाठी गावकर्‍यांसह पंचक्रोशीतील तूकाविप्र मठाच्या भक्तगणांनी प्रयत्न करावेत अशी विनंती केली याचबरोबर श्री संत तुकाविप्र महाराजांचे विचार व अभंग श्री संत नामदेव महाराज व श्री संत तुकारामांच्या गाथेप्रमाणे जनमानसात रुजावेत तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून भक्तगणांचा ओढा सुरू होऊन इतर संत पिठाप्रमाणे अंजनवती हे ठिकाण तीर्थक्षेत्र म्हणून विकसित व्हावे अशी प्रामाणिक अपेक्षा व्यक्त केली त्यांच्या कीर्तन सेवेनंतर समस्त गावकर्‍यांच्या वतीने बाळासाहेब आत्मारामबुवा मोरे पाटील यांनी विवेक महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या वेळी जनक मोरे, शिवमुर्ती येडे, परमेश्वर माळवाले, श्रीमंत काका येडे, हरीओम शेळके,सुरेश मोरे,बन्सीधर सगळे, कैलास काटवटे, पद्माकर कुलकर्णी, श्रीरंग येडे, पांडुरंग भुमकर,आश्रुबा बाबुराव येडे,बंकट पाटील, कृष्णा जोशी, विठ्ठल शिवाजी येडे, भगवानभाऊ येडे, पांडुरंग किसनराव पाटील, ज्ञानोबाभाऊ येडे, बाबासाहेब सोनवणे, भाऊसाहेब बहिर, अरुण शिंदे, तुळजीराम माने,भरतराव काटवटे, आनंदराव आमटे, विष्णू बप्पा येडे, आश्रुबा बाजीराव काटवटे,रावसाहेबदादा येडे, भगवान थोरात, रामहरी आनंदराव येडे,शिरीष जोशी पोहनेरकर,लहुराव चाळक, गजेंद्र मारुती मोरे, कृष्णा शिंदे, बाबुराव देशमुख, दत्तात्रय काळे,वसंत चव्हाण, चंद्रकांत पांचाळ, पंडीत थोरात, दादासाहेब ढगे, जालींदर जाधव, बंडू सावंत, बाबुराव घरत यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थीती लाभली होती तसेच याप्रसंगी अंजनवती ग्रामस्थांसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणांवरून आलेल्या हजारो भाविक भक्तांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!