ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने : जामखेड येथे शिवजयंती उत्सव साजरा

मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने : जामखेड येथे शिवजयंती उत्सव साजरा

जामखेड प्रतिनिधी;-रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील एक महत्त्वाचा गुण म्हणजे धर्मनिरपेक्षता. महाराजांनी हा गुण जनतेपर्यंत पोहचवला आणि अजूनही तो माणसांमध्ये जिवंत आहे. शिवजयंती निमित्त हीच महाराजांना खरी मानवंदना ठरणार आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे उत्तम उदाहरण म्हणजे जामखेड येथील सार्वजनिक शिवजयंती असे मत मुस्लिम पंच कमिटी चे अध्यक्ष अझहर भाई काझी यांनी व्यक्त केले.

जामखेड मुस्लिम पंच कमिटी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते.शिवजयंती निमित्त विविध उपक्रम राबविले होते.या मध्ये शरीर सौष्ठ स्पर्धा, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार तसेच सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती ५१,००० हजार रुपये वर्गणी देण्यात आली.जामखेड शहरातील खर्डा चौक, पंचायत समिती समोर जामखेड सेंटर काॅम्प्लेक्स येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करूनअभिवादन करण्यात आले.तसेच सायंकाळी भव्य मिरवणूकीत सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.सामाजिक सलोखा जपण्यासाठी एकत्र येण्याचा संदेश यातून दिला.

यावेळी मुस्लिम पंच कमिटी चे अध्यक्ष अझहर भाई काझी,हाजी मंजूर सय्यद , मुख्तार सय्यद (टेलर) , इस्माईल सय्यद,आबेद खान साहेब ,शेरखान भाई ,इम्रान कुरेशी ,फरमानभाई शेख,इस्माईल शेख ( टेलर),याकुब तांबोळी ,नय्युम भाई सुभेदार,परवेज खान,आसिफ शेख ,जावीद सय्यद (बारुद),जावीद बागवान,अर्शद शेख,नाजीम काझी,जाहेरभाई मिस्त्री,जाफर सय्यद,हाजी नादीर शेख,सलिम तांबोळी आदी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!