ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

अंमळनेर, पिंपळवंडी,पांढरवाडीफाटा,जाटनांदुरफाटा, डोंगरकिन्हीत मनोज जरांगे यांच्या आव्हानाला प्रतिसाद, दोन तास वाहतुक ठप्प

 

अंमळनेर दि.२५(प्रतिनिधी)

संघर्षयौद्धा मनोज जरांगे यांनी २४ फेब्रुवारी रोजी चक्क जाम करण्याच्या अवाहनाला मराठा समाजाकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. पाटोदा तालुक्यातील अंमळनेर, पिंपळवंडी, पांढरवाडीफाटा ,जाटनांदुरफाटा ,
डोंगरकिन्ही आदी ठिकाणी सकाळी ११ते १ असा दोन तास मुख्य मार्गावर चक्का जाम करण्यात आला. विशेष म्हणजे वैद्यकीय सेवा आणि आवश्यक कामे असलेल्यांना यावेळी वाट मोकळी करुन देण्यात आली. पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने आंदोलनाला कुठलेही गालबोट न लागता शांतपणे संपन्न झाल्याने अंमळनेर पोलीसांनी आंदोलन करणार्या मराठा बांधवांचे आभार मानले.
मनोज जरांगे यांचे आंदोलन जाहीर होताच अंमळनेर ठाण्याचे स.पो.नि.भार्गव सपकाळ यांनी प्रमुख आंदोलन करणार्या मराठा समाजातील बांधवांची एक बैठक शुक्रवारी सायंकाळी बोलावली होती यामध्ये आंदोलन शांततेत करण्याचे अवाहन पोलीस प्रशासनाने केले होते. आजपर्यंत सर्व आंदोलने शांततेच्या मार्गाने झाले असुन हे आंदोलन. देखील शांततेत पार पडेल असा विश्वास मनोज जरांगे यांच्या समर्थकाकडुन देण्यात आला होता. अखेर हा विश्वास कायम ठेवत आंदोलन शांतते संपन्न झाले. अंमळनेर पोलीस ठाण्याअंतर्गत कुठलाच अनुचित प्रकार घडला नाही. एक मराठा लाख मराठा घोषणेने परिसर दणाणून गेला होता. मनोज दादा जरांगे जो आदेश देतील तो सर्वांना मान्य असेल आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्धार करण्यात आला. मनोज जरांगे यांनी ओबीसीतून आरक्षण देण्याची केलेली मागणी योग्य असुन सगेसोयरे याची अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. चक्का जाम दरम्यान बीड – नगर मार्ग जागोजागी बंद असल्याने रस्त्याच्या दुतर्भा रांगच रांगा लागल्या होत्या .अंमळनेर, पिंपळवंडी, पांढरवाडीफाटा, जाटनांदुर फाटा ,डोंगरकिन्ही आदी चारही ठिकाणी अंमळनेर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता ,आंदोलनकर्ते आणि पोलीस या दोघांनी एकमेकाचा मान राखीत आंदोलनाला तडा जाऊ न देता आंदोलन शांतेत पार पाडले .

error: Content is protected !!