ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

वंचिताची सत्ता वंचित लोकांकडेच राहिली पाहिजे दुसऱ्याच्या चटाया उचलण्यापेक्षा आपली चटई आपलीच घोंगडी आपली सत्ता- ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव.

वंचिताची सत्ता वंचित लोकांकडेच राहिली पाहिजे दुसऱ्याच्या चटाया उचलण्यापेक्षा आपली चटई आपलीच घोंगडी आपली सत्ता- ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव.

दिनांक -२८/०२/२०२४ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता खर्डा शहरातील ३४ विविध जाती-धर्म सामुदायातील लोकांना संवाद मीटिंग साठी आमंत्रित केले होते. या मिटींगला वंचित बहुजन आघाडीचे भटके- विमुक्त राज्य समन्वयक ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव हे म्हणाले की आत्तापर्यंत खर्डा हा गरीब, कष्टकरी, भटकी विमुक्त, आदिवासी, गरीब, शेतकरी, मुस्लिम तसेच सर्व वर्गातील कामगार समाजा हे लोक अनेक दिवसापासून सत्तेपासून वंचित आहेत त्याचे कारण म्हणजे आपण संघटित नाहीत इथून पुढच्या काळामध्ये आपण *दुसऱ्यांच्या चटाया उचलण्यापेक्षा आपल्या चटाया आपला गुलाल आपली सत्ता आली पाहिजे*. रात्र दिवस कष्ट करू स्वाभिमानाने जगू आपला माणूस सत्तेमध्ये गेला तर आपण आपल्या लोकांना न्याय मिळवून देऊ असे वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक ॲड.डॉ. अरुण (आबा) जाधव हे बोलत होते. तसेच निजाम भाई मुजावर म्हणाले की, आत्तापर्यंत पुढाऱ्यांच्या खोट्या वक्तव्याला आपण सगळेजण बळी पडतोय. आत्तापर्यंत आपण बळी पडलो इथून पुढे बळी पडायचे नाही. इथून पुढच्या काळामध्ये आपण संघटित राहून समाजाला न्याय देण्याचे काम आपण सगळेजण ॲड डॉ. अरुण (आबा) जाधव माध्यमातून करू अशी ग्वाही यांना दिली. यानंतर ह्या बैठकीचे अध्यक्ष ॲड. गायकवाड म्हणाले की, मागचा इतिहास आम्ही सर्वजण विसरून चाललोय. आपला अधिकार पण विसरून चाललोय हे सांभाळण्याचं काम आपलं सर्वांचं आहे. या बैठकीचे सूत्रसंचालन विशाल पवार यांनी केले. ह्या बैठकीचे समारोप पिंटू जगताप यांनी केला. उपस्थित सर्व समाजातील लोकांनी आपले प्रश्न मांडले. यापुढील काळामध्ये आपण सर्व एकत्र राहून सत्तेमध्ये जाऊ अशी ग्वाही सर्व जातीतल्या कार्यकर्त्यांनी अरुण आबा यांना ग्वाही दिली. या मीटिंग साठी उपस्थितीत अंकुश पवार, राहुल डाळे, सुनील कांबळे, प्रकाश सोनटक्के, खलील मुजावर, बाळा मुजावर, इस्माईल मुजावर, हमीद मुजावर, शेख चांद मुजावर, लखन जाधव, निजाम मुजावर, प्रवीण सदाफुले, मुबारक मुजावर, निजाम मुजावर, कबीर मदारी, फकीर मदारी, दिलीप काळे, ईश्वर पवार, नितीन, दिगंबर, असलम मदारी, सलीम मदारी, मेहमूद मुजावर, नितीन पवार, राजू लोंढे, विकास जगताप, सागर चव्हाण, पंडित शेळके, अनिल काळे, भीमा काळे, आकाश काळे, पिंटू वाडीले, तुकाराम शिंदे, पप्पू राऊत, मंगेश जावळे, सचिन पगार, राजू लोंढे, किशोर आसिफ, हिशोब शेख, शहानुर काळे, निलेश पवार, वडार समाजाचे नेते बबलू सुरवसे, राजू लोंढे, दिनेश चव्हाण, राजीव लोंढे तसेच बहुसंख्यांनी कार्यकर्ते उपस्थित होते. या मीटिंगच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते भीमराव सुरवसे, लोकाधिकार आंदोलन संघटनेचे तालुकाध्यक्ष विशाल पवार, सचिन भिंगारदिवे, संविधान प्रचारक दिपाली काळे, आलेस शिंदे, राजू शिंदे, ऋषिकेश गायकवाड मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!